
मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मात्र कोरोनाच्या या नकारात्मक वातावरणात मुंबईसाठी शुभसंकेत मिळत आहे.

मुंबईतील शिवाजी पार्क गोड्या पाण्याचे 5 स्त्रोत सापडले आहे. शिवाजी पार्क या ठिकाणी 300 मीटर अंतरावर समुद्र किनारा आहे. मात्र तरीही शिवतीर्थावर गोड्या पाण्याचे स्त्रोत आढळले आहे.

शिवतिर्थावर गोड्या पाण्याचे स्त्रोत सापडणं ही फार मोठी बाब मानली जात आहे.

काही दिवसांपूर्वी शिवाजी पार्कचे नुतनीकरण करण्याचा प्रस्ताव शिवसेनेकडून मांडण्यात आला होता. या नुतनीकरणासाठी शिवाजी पार्कचे भुगर्भदन्यांकडून परीक्षण करण्यात आले होते.

या परिक्षणाअंतर्गत 5 स्त्रोतांद्वारे एकूण 35 रिंग वेळ विहीरी खणण्यात येत आहेत. यात पावसाचं पाणी जमण्याआधी गोड पाणी सापडलं आहे.

तसेच शिवाजी पार्कमध्ये होणार धुळीचा त्रास कमी व्हावा यासाठी रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबवला जात आहे.