AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईसह राज्यात अवकाळी पाऊस, मध्य रेल्वे विस्कळीत, वीज पुरवठा खंडीत

मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. जोरदार वारे आणि पावसामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे, तर नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. हवामान खात्याने पुढील काही तासांमध्ये अधिक पावसाचा इशारा दिला आहे. उकाड्याने त्रस्त झालेल्या लोकांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी अचानक आलेल्या पावसामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.

मुंबईसह राज्यात अवकाळी पाऊस, मध्य रेल्वे विस्कळीत, वीज पुरवठा खंडीत
mumbai rain
| Updated on: May 06, 2025 | 10:49 PM
Share

मुंबई शहरासह उपनगरात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या. ऐन मे महिन्यात पाऊस कोसळल्याने उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र अचानक आलेल्या पावसामुळे चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली. अचानक आलेल्या या पावसाचा फटका मुंबई लोकलला बसला आहे.

मध्य रेल्वेला अवकाळी पावसाचा फटका

मुंबईतील अवकाळी पावसामुळे मध्य रेल्वेची लोकल सेवा उशिराने सुरु आहे. तब्बल 20 ते 25 मिनिटे लोकल सेवा उशिराने सुरु आहे. सीएसएमटीहून ते कर्जतकडे जाणारी लोकल सेवा विस्कळीत झाला आहे. मध्य रेल्वेला अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जोरदार वाऱ्यामुळे ओव्हरहेड वायर्समध्ये समस्या येत असल्याने गाड्या उशिराने धावत आहेत. हार्बर लाईनवर गाड्या ५ ते ७ मिनिटे उशिराने धावत असल्याची माहिती मिळत आहे.

भारतीय हवामान विभागाने एक नवीन इशारा जारी केला आहे. पुढील ३ ते ४ तासांमध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर आणि नाशिक जिल्ह्यांच्या काही भागांमध्ये ५० ते ६० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. यासोबतच गडगडाटी वादळ आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने नागरिकांना बाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

उकाड्याने हैराण झालेल्यांना दिलासा

सध्या मुंबई उपनगरातील कांदिवली, बोरिवली आणि दहिसर भागात जोरदार वाऱ्यासह हलक्या सरी कोसळताना दिसत आहे. तसेच सायन, कुर्ला आणि चुनाभट्टी परिसरातही रिमझिम पाऊस पडताना दिसत आहे. ठाण्यातही सध्या जोरदार पाऊस सुरु आहे. ऐन मे महिन्यातच पाऊस कोसळल्याने उकाड्याने त्रस्त झालेल्या राज्यातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र अचानक आलेल्या पावसामुळे त्यांची चांगलीच तारांबळ उडाली. गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठी वाढ झाली असल्याने ठाणेकर उकाड्याने हैराण झाले होते. आता या पावसामुळे तापमानात घट होण्याची शक्यता आहे. अंबरनाथ शहरातही अवकाळी पावसाने जोरदार सुरुवात केली. अंबरनाथमध्ये सोसाट्याचा वारा आणि धुळीचे वादळ पाहायला मिळत आहे. अंबरनाथमध्ये पावसामुळे अनेक भागांतील वीज पुरवठा खंडित झाला आहे.

कल्याणमध्येही सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. ज्यामुळे घरी परतणाऱ्या चाकरमान्यांची मोठी तारांबळ उडाली. तसेच पावसामुळे कल्याणमध्ये अनेक ठिकाणी बत्ती गुल झाली आहे. महावितरणकडून वीज पुरवठा सुरळीत करण्यात अडचणी येत आहेत.

वसई-विरारमध्ये जनजीवन विस्कळीत 

वसई-विरार परिसरात रात्री अचानक झालेल्या अवकाळी पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. जोरदार वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या पावसाच्या धारांमुळे अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. वसईतील विविध भागांमध्ये फुलझाडांच्या बागांचे मोठे नुकसान झाले आहे. जोरदार वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या तुटल्या, फुलांचे नुकसान झाले. तर विरारमध्ये एका हळदी समारंभाला या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. समारंभासाठी उभारलेले मंडप कोसळले, तर विद्युत उपकरणे आणि सजावटीचे साहित्य भिजल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. पावसामुळे अनेक रस्त्यांवर पाणी साचले आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची धांदल उडाली असून, हवामान खात्याने पुढील काही तासांत आणखी पावसाची शक्यता वर्तवली आहे.

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.