AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी नामुष्की, मुंबई विद्यापीठाने स्वत:चं नाव चुकीचं छापलं, 1.64 लाख पदवी प्रमाणपत्रांचा कचरा ?

मुंबई विद्यापीठ नावाजलेले विद्यापीठ असून देशातील एक नामवंत विद्यापीठ आहे. ग्रॅज्युएशनच्या सर्टीफिकीकेट्सवर प्रिटींग मिस्टेकमुळे विद्यापीठाला टीकेचे धनी व्हावे लागत आहे. मागे एका विद्यार्थ्याचे आडनाव KITE होते तर त्याचे नाव पतंग म्हणून प्रसिद्ध झाले होते. आता तर मुंबईची स्पेलिंग चुकविली आहे.

मोठी नामुष्की, मुंबई विद्यापीठाने स्वत:चं नाव चुकीचं छापलं, 1.64 लाख पदवी प्रमाणपत्रांचा कचरा ?
| Updated on: Mar 01, 2025 | 9:35 PM
Share

देशातीलच नव्हे तर जगातील नावाजलेले मुंबई विद्यापीठातून ग्रॅज्युएशन पूर्ण झालेल्या मुलांच्या प्रमाणपत्रावर मुंबईची स्पेलिंग चुकीचे छापल्याचे उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकाराने विद्यार्थ्यांमध्ये हडकंप माजला आहे. mumbai चे स्पेलींग ‘Mumabai’असे चुकीचे प्रसिद्ध झाल्याने विद्यापीठाच्या इतक्या वर्षांच्या प्रतिष्ठेला बट्ट्या लागला आहे. मुंबई विद्यापीठाची स्थापना स्वातंत्र्याचे पहिले समर जेव्हा सुरु झाले त्या 1857 साली झाली होती. या विद्यापीठातून अनेक मानवंत ग्रॅज्युएट झाले आहेत.

साल 2023-24 या शैक्षणिक वर्षात मुंबई युनिव्हर्सिटीतून एकूण 1.64 लाख विद्यार्थी ग्रॅज्युएट झाले आहेत. दीक्षांत समारंभात जेव्हा विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र वाटण्यात आली तेव्हा त्यावर ‘Mumbai’ ऐवजी ‘Mumabai’ असे प्रिंट झाल्याचे निदर्शनास येताच विद्यार्थ्यांच्या पोटात गोळा उठला आहे.  झालेल्या प्रकाराबद्दल विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

मुंबई यूनिव्हर्सिटीतून शैक्षणिक वर्ष 2023-24 मधून पदवी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर त्यातील मुंबईचे स्पेलींग ‘Mumabai’ असे छापलेले आढळल्याने खळबळ उडाली आहे.  या टायपो एररने विद्यार्थी आणि प्रोफेसर देखील हैराण झाले आहेत. त्यांनी या संदर्भात नाराजी व्यक्त केली आहे. तर विद्यापीठ प्रशासनाने झालेल्या प्रकाराबद्दल दीलगिरी व्यक्त करीत सर्व विद्यार्थ्यांची प्रमाणपत्र बदलून दिली जातील असे म्हटले आहे. शिवाय या चुकीच्या प्रमाणपत्राच्या बदल्यात नवीन प्रमाणपत्र दिल्यानंतर त्याचे कोणतेही नवे शुल्क आकारले जाणार नाही असे विद्यापीठ प्रशासनाने म्हटले आहे.

1.64 लाख विद्यार्थ्यांच्या सर्टिफिकेटवर चुकीचे प्रिंटिंग?

शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये मुंबई यूनिव्हर्सिटीमधून एकूण 1.64 लाख विद्यार्थी ग्रॅज्युएट झाले आहेत.यापैकी किती विद्यार्थ्यांना अशी चुकीची पदवी प्रमाणपत्रे मिळाली आहेत याची कोणतीही आकडेवारी मिळालेली नाही..विद्यापीठाच्या या चुकीमुळे विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर आपली नाराजगी जाहीर केली आहे.या चुकीच्या स्पेलींगची प्रमाणपत्रे सोशल मीडियावर पोस्ट केली जात आहेत.

मुंबई विद्यापीठाचा खुलासा

हा केवळ एक प्रिंटिंग एरर आहे. ज्यामुळे काही प्रमाणपत्रांवर अशा प्रकारे चुकीचे प्रसिद्ध झाले आहे. या प्रमाणपत्रांना मागे घेतले जात असून यात बदल करुन विद्यार्थ्यांना नव्याने पदवी प्रमाणपत्रे जारी केली जातील असे विद्यापीठ प्रशासनाने म्हटले आहे.

Follow Us
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
मोठी बातमी! तृणमूल चिन्ह सुनावणीबाबत मोठी अपडेट, न्यायालयाकडून तातडी..
मोठी बातमी! तृणमूल चिन्ह सुनावणीबाबत मोठी अपडेट, न्यायालयाकडून तातडीचे निर्देश
महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढा; मंगलप्रभात लोढांची बाप्पाच्या...
महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढा; मंगलप्रभात लोढांची बाप्पाच्या चरणी विशेष प्रार्थना
चार एकर सोयाबीन, लाखोंचा खर्च अन् पदरी नुकसान; फडणवीसांसमोर शेतकरी...
चार एकर सोयाबीन, लाखोंचा खर्च अन् पदरी नुकसान; फडणवीसांसमोर शेतकऱ्यांचा आक्रोश
कणाहीन निवडणूक आयोगाची चौकशी करा; राज ठाकरेंनी थेट ज्ञानेश कुमार...
निवडणूक आयोगाचीच चौकशी करा; राज ठाकरेंनी थेट ज्ञानेश कुमारांना घेरलं
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार तत्पर; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे...
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार तत्पर; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली महत्त्वाची माहिती
राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला इशारा; ‘वेळ आल्यावर...
Rahul Gandhi : राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला इशारा; ‘वेळ आल्यावर... नेमकं प्रकरण काय?
मुख्यमंत्री फडणवीस अमरावती वाशिम दौऱ्यावर दुष्काळी परिस्थितीचा घेणार..
मुख्यमंत्री फडणवीस अमरावती वाशिम दौऱ्यावर दुष्काळी परिस्थितीचा घेणार आढावा
ज्ञानेश कुमार यांच्यामागचा बॉस कोण? संजय राऊतांनी सरळ नावचं सांगून...
ज्ञानेश कुमार यांच्यामागचा बॉस कोण? संजय राऊतांनी सरळ नावचं सांगून टाकलं