Uddhav Thackeray: मुंबई महापालिका निवडणुका शिवसेना जिंकणारच, उद्धव ठाकरेंना आत्मविश्वास, वॉर्डमध्ये फिरा, लोकांची कामे करा, माजी नगरसेवकांना कानमंत्र

| Updated on: Aug 12, 2022 | 2:35 PM

लोकांसोबत काम करणे हा शिवसैनिकांचा गुणधर्म आहे, ही कामे करत राहा, वॉर्डामध्ये फिरा असा कानमंत्र उद्धव ठाकरे यांनी नगरसेवकांना दिला आहे. जे कुणी गेले त्यांची आपल्याला पर्वा नाही, शिवसैनिक आपल्यासोबत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.

Uddhav Thackeray: मुंबई महापालिका निवडणुका शिवसेना जिंकणारच, उद्धव ठाकरेंना आत्मविश्वास, वॉर्डमध्ये फिरा, लोकांची कामे करा, माजी नगरसेवकांना कानमंत्र
जिंकणारच, उद्धव ठाकरेंचा आत्मविश्वास
Image Credit source: TV 9 marathi
Follow us on

मुंबई- आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या तयारीला लागा असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  (Uddhav Thackeray) माजी नगरसेवकांना दिले आहेत. मुंबईत आज त्यांनी माजी नगरसवेकांना मार्गदर्शन केले. मुंबई महापालिका निवडणुका (BMC Election)शिवसेना (shivsena)जिंकणारच. असा आत्मविश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. ही महापालिका निवडणूक तुमच्याच जीवावर जिंकणार, असे उद्धव ठाकरे यांनी माजी नगरसेवकांना सांगितले आहे. लोकांसोबत काम करणे हा शिवसैनिकांचा गुणधर्म आहे, ही कामे करत राहा, वॉर्डामध्ये फिरा असा कानमंत्र उद्धव ठाकरे यांनी नगरसेवकांना दिला आहे. जे कुणी गेले त्यांची आपल्याला पर्वा नाही, शिवसैनिक आपल्यासोबत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. जनतेची कामे करत राहा, सामाजिक बांधिलकी सोडू नका, असा सल्ला या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

कुणाच्याही आमिषाला बळी पडू नका – उद्धव ठाकरे

कुणाच्याही अमिषाला बळी पडू नका, असा सल्लाही या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी माजी नगरसेवकांना दिला आहे. २०१७ ची वॉर्ड रचना ठेवण्याचा आदेश आता एकनाथ शिंदे सरकारने दिले आहेत. त्याला विरोध करत शिवसेना कोर्टात जाणार असल्याची माहिती आहे. नव्या वॉर्ड रचनेत पुन्हा एकदा आरक्षणे बदलण्याचीही शक्यता आहे. या सगळ्यामुळे पुन्हा एकदा निवडणूक लांबणीवर जाण्याचीही शक्यता आहे. अशा स्थितीत या नव्या निर्णयाला आव्हान देण्याचा शिवसेनेचा मानस आहे. पावसाळा अर्धा उलटला आहे, असा स्थितीत कोरोना, स्वाईन फ्ल्यू सारख्या आजारांची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा काळात मुंबईकरांच्या मदतीला धावून जा, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.

13 माजी नगरसेवक होते अनुपस्थित

या बैठकीला १३ माजी नगरसेवक अनुपस्थित होते. मात्र या बैठकीचे निरोप काल दुपारनंतर गेले होते, जे आज अनुपस्थित होते त्या सगळ्यांनी त्यांची कारणे पक्षाला कळवली होती, अशी माहिती किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. या बैठकीत सर्व माजी नगरसवेकांना कामाला लागा असा मंत्रच या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी दिल्याचे किशोरी पेडणेकर यांनी बैठकीनंतर सांगितले आहे.

हे सुद्धा वाचा

शिंदे यांच्या बंडानंतर महापालिका निवडणूक प्रतिष्ठेची

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर मुंबई महापालिकेची राजकीय गणितं बदलणार आहेत, या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला खिंडार पाडण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. आता राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्याचा भाजपाचा मानस आहे. अशा स्थितीत ही मुंबई महापालिका निवडणूक ही उद्धव ठाकरे आणि शिवसेना यांच्यासाठी अस्तित्वाचा प्रश्न असण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही महापालिका निवडणूक प्रतिष्ठेची करुन ती जिंकून आणायचीच, अशी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेची भूमिका असण्याची शक्यता आहे.