AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BEST Bus : तुम्हीही कधी तरी फिरला असालच… मुंबईकरांची डबल डेकर बस 24 तासात रस्त्यावरून गायब होणार; पण…

90च्या दशकात बेस्टच्या ताफ्यात 900 डबल डेकर बसेस होत्या. मात्र, कालांतराने या बसेसची संख्या वाढण्याऐवजी घटतच गेली. या बसेसवर होणारा खर्च हे त्यामागील एक कारण होतं. त्यानंतर 2008नंतर बेस्टने आपल्या ताफ्यात डबल डेकर बसेस घेणं बंदच केलं.

BEST Bus : तुम्हीही कधी तरी फिरला असालच... मुंबईकरांची डबल डेकर बस 24 तासात रस्त्यावरून गायब होणार; पण...
double-decker busesImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 14, 2023 | 6:14 PM
Share

मुंबई | 14 सप्टेंबर 2023 : लहानपणी आई वडिलांसोबत किंवा कॉलेजात असताना तुम्ही तिच्यासोबत फिरला असाल. तिच्या सहवासात मनसोक्त रमला असाल. पावसाळ्यातही तिच्यासोबत पावसाचा भरपूर आनंद घेतला असाल. कधी तिच्यामागे धावता धावता तुमची दमछाकही झाली असेल. आजही तिच्या आठवणी तुमच्या ऊरात असतील. पण आता ती तुम्हाला कायमची सोडून जाणार आहे. परत तुम्हाला ती कधीच कधीच दिसणार नाही… तुम्ही बरोबर ट्रॅकवर आहात. मी तिच्याबद्दलच बोलतोय… तुमच्या मनात अजूनही ती घर करून आहे ना… तिच्याबद्दलच बोलतोय…. तीच ती… तुमची आमची मुंबईकरांची प्रिय डबल डेकर बस… होय, आपली लाडकी डबल डेकर बस आता इतिहासजमा होणार आहे. अवघ्या 24 तासात ती दिसेनाशी होईल. 86 वर्षाची अविरत साथ अचानक तुटणार आहे…

बेस्ट प्रशासनाने हा मोठा निर्णय घेतला आहे. उद्या 15 सप्टेंबरपासून डिझेलवर चालणारी डबल डेकर बस बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे उद्यापासून ही डबल डेकर बस रस्त्यावरून धावताना दिसणार नाही. मुंबईच्या ताफ्यात फक्त जेमतेम सात डबल डेकर बस आहेत. त्यापैकी तीन ओपन डेक आहेत. उद्या 15 सप्टेंबरपासून डबल डेकर बस आणि 5 ऑक्टोबरपासून ओपन डेक बस बंद केल्या जाणार आहेत. त्यामुळे या बस बंद होताच डबल डेकर बस इतिहास जमा होणार आहेत.

म्हणून बसेस हटवणार

या बसेस डिझेलवर चालणार असल्याने त्या बंद केल्या जाणार आहेत. या बसेसची लाईफ फक्त 15 वर्षाची असते. या सातही बसेसची 15 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यामुळे या बसेस ताफ्यातून हटवल्या जाणार आहेत. मुंबईची ओळख असलेल्या डबल डेकर बस गेल्या 86 वर्षापासून मुंबईच्या रस्त्यावर धावत आहेत. 1937 मध्ये इंग्रजांनी या डबल डेकर बस मुंबईतील रस्त्यावरून चालवल्या. त्यानंतर या बसेस वाहतुकीचं एक महत्त्वाचं साधन बनल्या.

म्हणून संख्या घटली

डबल डेकर बसशिवाय बेस्टच्या ताफ्यात ओपन डेक बसही आहेत. पूर्वी या ओपन डेक बसमधूनही लोक प्रवास करायचे. नंतर पर्यटकांसाठीच या बसेस वापरल्या जाऊ लागल्या. या ओपन डेक बसही आता 5 ऑक्टोबरपासून बेस्टच्या ताफ्यातून हटवल्या जाणार आहेत.

या डबल डेकर धावणार

आता या डिझेलवर चालणाऱ्या डबल डेकर बसेसच्या जागी इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या डबल डेकर बसेस दावणार आहेत. या नव्या डबल डेकर बसेसचा रंग रेड अँड व्हाईट असेल. जुन्या डबल डेकर बसचा रंग फक्त लाल होता. तसेच पर्यटकांसाठी लवकरच ओपन डेक बसेसही खरेदी केल्या जाणार आहेत. या ओपन डेक बसही इलेक्ट्रिक असतील.

यावर्षी फेब्रुवारीतच बेस्टच्या ताफ्यात इलेक्ट्रिक डबल डेकर बसेस आल्या. एकूण 25 बसेस खरेदी करण्यात आल्या. त्याची किंमत दोन कोटीहून अधिक आहे. तर डिझेलवर चालणाऱ्या एका डबल डेकर बसवर किंमत 30 ते 35 लाख रुपये खर्च होतात.

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.