AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gyanu! It’s done bro : ग्यानू डन ब्रो… एक बिस्कीट दो चाय, ज्ञानेश कुमार बाय बाय… जेनजींच्या घोषणांनी शिवाजी पार्क सोडलं दणाणून…

आज शिवाजी पार्कात जेन-झीने निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी जोरदार एल्गार पुकारला. निवडणुकीतील कथित घोटाळ्यांविरोधात तरुणाईने त्यांच्या अनोख्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. शबाना आझमी, विशाल ददलानी आणि ठाकरे गटाचे प्रतिनिधीही उपस्थित होते.

Gyanu! It's done bro : ग्यानू डन ब्रो... एक बिस्कीट दो चाय, ज्ञानेश कुमार बाय बाय... जेनजींच्या घोषणांनी शिवाजी पार्क सोडलं दणाणून...
Gen Z ProtestImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 02, 2026 | 6:31 PM
Share

दादरच्या शिवाजी पार्कात आज भलं मोठं वादळ आलं. हे वादळ वाऱ्यावावधाणाचं नव्हतं, रिमझिम सरींचं नव्हतं. तर हे वादळ होतं कॉकरोचचं. तरुणाईचं. जेनजीचं. या तरुणाईने आज शिवाजी पार्क मैदानाला हिरवपण दिलं. बऱ्याच वर्षानंतर शिवाजी पार्क मैदानाने कात टाकली. सळसळता उत्साह पाहायला मिळाला. जिवंतपणा जाणवला. जेनजींच्या अनोख्या आणि त्यांच्या जनरेशनच्या घोषणांनी या शिवाजी पार्काच्या कणकणात प्राण फुंकले गेले. ग्यानू डन ब्रो…च्या घोषणांनी शिवाजी पार्कचा आसमंत चिरला गेला. एक बिस्कीट दो चाय, ज्ञानेश कुमार बाय बाय…च्या घोषणेने तर हाकेच्या अंतरावर असलेला अरबी समुद्रही ढवळून निघाला. आजच्या मोर्च्याने चळवळ जिवंत असल्याचा पुन्हा फिल आला.

अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वात शिवाजी पार्कात आज जेनजींनी एल्गार पुकारला. निवडणुकीतील कथित घोटाळया प्रकरणी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा देण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला अभिनेत्री शबाना आजमी आणि संगीतकार विशाल ददलानी उपस्थित होते. ठाकरे गटाचे प्रतिनिधी उपस्थित होते. दुपारपासूनच शेकडो जेनजींनी शिवाजी पार्कात ठाण मांडलं होतं. हातात तिरंगा घेऊन ज्ञानू, डन ब्रोच्या घोषणा देत हे तरुण शिवाजी पार्कात जमले होते.

जोर से बोलो, गो ज्ञानू गो…

यावेळी जेनजींनी त्यांच्या जनरेशनच्या भाषेतील घोषणा दिल्या. संपूर्ण परिसर दणाणून सोडला. ग्यानू मस्ट गो…, ग्यानू डन ब्रो…, एक बिस्किट दो चाय, ग्यानेश कुमार बाय बाय…, धर्मेंद्र प्रधान झांकी है, ज्ञानेश कुमार बाकी है…. जोर से बोलो, गो ज्ञानू गो…, एक कचोरी, दो समोसा… ज्ञानू पर नही भरोसा… आदी घोषणांनी तरुणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय… अशा मराठी घोषणाही देण्यात आल्या. त्यामुळे संपूर्ण शिवाजी पार्क परिसर दणाणून गेला होता.

जय भीम… जय शिवाजी…

जय जय जय जय जयभीम… जयभीम जयभीम…, जोर से बोलो जयभीम… जय भवानी, जय शिवाजी…, छत्रपती शिवाजी महाराज की जय…, छत्रपती संभीजी महाराज की जय…, भारत माता की जय…. वंदे मातरम… वंदे मातरम… आदी घोषणाही तरुणांनी दिल्या.

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा