VIDEO: मी आंबेडकरवादी, जयभीमवाला; ज्ञानदेव वानखेडेंनी पत्रकार परिषदेतच दाखवलं जातीचं सर्टिफिकेट

| Updated on: Oct 31, 2021 | 1:32 PM

ज्ञानदेव वानखेडे आणि त्यांची अभिनेत्री सून क्रांती रेडकर यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची आज भेट घेतली. यावेळी त्यांनी आठवलेंशी अर्धा तास चर्चा करून त्यांना सर्व प्रमाणपत्रं दाखवली. (My son or I never converted, allegations are false: Dnyandev Wankhede)

VIDEO: मी आंबेडकरवादी, जयभीमवाला; ज्ञानदेव वानखेडेंनी पत्रकार परिषदेतच दाखवलं जातीचं सर्टिफिकेट
Dnyandev Wankhede
Follow us on

मुंबई: मी आंबेडकरवादी आहे. जयभीमवाला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मी इथपर्यंत आलो आहे. माझा मुलगाही इथपर्यंत आला आहे, असं सांगतानाच एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी भर पत्रकार परिषदेतच त्यांच्या जातीच्या सर्टिफिकेटसह इतर प्रमाणपत्रं दाखवली.

ज्ञानदेव वानखेडे आणि त्यांची अभिनेत्री सून क्रांती रेडकर यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची आज भेट घेतली. यावेळी त्यांनी आठवलेंशी अर्धा तास चर्चा करून त्यांना सर्व प्रमाणपत्रं दाखवली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन हा दावा केला. मी आंबेडकरवादी, जयभीमवाला आहे. महार जातीचा आहे. मला त्याचा मला अभिमान आहे. मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच इथपर्यंत आलो आहे. माझा मुलगाही आला आहे. आम्ही दलितांचे हक्क हिरावले नाही. मी आंबेडकरवादी आहे. तुम्ही आमच्यावर निराधार आरोप करू नका, असं आवाहन करतानाच वानखेडे यांनी सर्व कागदपत्रेच मीडियासमोर सादर केले.

आम्ही धर्मांतर केलंच नाही

मी जन्मल्यापासून शाळेच्या दाखल्यापर्यंत एनसीसी आणि सर्व्हिसला लागल्यापासूनचे सर्व कागदपत्रं आमच्याकडे आहेत. मी कधीही धर्मांतर केलं नाही. मी महार जातीतील आहे. मी मुस्लिम महिलेशी 1978मध्ये लग्न केलं आहे. मी हिंदू पद्धतीने लग्न केलं आहे. समीर आणि मी कधीही धर्मांतर केलं नाही, असा दावा करतानाच आमच्यावरील खासगी आरोप थांबवा. प्रश्न फक्त ड्रग्जचा आहे. तुमच्या जावयाला अटक केल्यामुळे आम्हाला बदनाम करू नये. तुम्ही कोर्टात जावं आमची बदनामी करू नका, असं त्यांनी सांगितलं.

मग आम्ही जायचं कुठे?

रामदास आठवले हे मागासवर्गीयांचा हक्क हिरावणाऱ्यांच्या पाठी उभं राहतात हे दुर्देव आहे, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले होते. मलिक यांच्या या विधानावर क्रांती रेडकरने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. रामदास आठवले आम्हाला भेटले हे कुणाला दुर्देवाचं वाटत असेल तर आम्ही जायचं कुठे? एका प्रामाणिक अधिकाऱ्याच्या पाठी उभं राहणं चुकीचं आहे का?, असा सवाल करतानाच आम्ही आठवलेंना सर्व कागदपत्रं दिली आहेत. नवाब मलिक मीडियासमोर काही कागदपत्रं दाखवत असतील आणि तुम्ही तेच सत्य मानत असाल तर कृपया डोळे उघडा. माझी हातजोडून विनंती आहे. सत्य काय ते जाणून घ्या, असं आवाहन क्रांतीने केलं.

वानखेडे फ्रॉड नाही

आठवले आमच्यासोबत आहे. ते दलितांच्या पाठी खंबीरपणे उभे राहतात. आम्ही आठवलेंना सर्व माहिती दिली आहे. त्यांना पूर्ण पुरावे दिले आहेत. त्यामुळे त्यांचा आमच्यावर विश्वास बसला. नवाब मलिक यांचे सर्व आरोप खोटे ठरले आहेत. कास्ट सर्टिफिकेटपासून मॅरेज सर्टिफिकेटपासून त्यांचे सर्व दावे फोल ठरले आहेत, असं सांगतानाच नवाब मलिक मोठे नेते आहेत. आमच्याही पाठी मोठा नेता आहे. आम्ही त्यांच्या मदतीने तुम्हाला पुरावा देणार आहोत. त्यामुळे समीर वानखेडे फ्रॉड आहेत की नवाब मलिक आहेत हे दिसून येईल, असंही त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

अभिनेत्री क्रांती रेडकर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंच्या भेटीला, रामदास आठवलेंकडून पाठिंबा जाहीर

नवाब मलिकांचे सर्व आरोप खोटे, क्रांती रेडकर यांचा पुन्हा एकदा दावा

सिंधुदुर्गच्या मेडिकल कॉलेजची परवानगी नाकारली, केंद्रीय मंत्री खरा झारीतला शुक्राचार्य, विनायक राऊतांचं नारायण राणेंवर अप्रत्यक्ष टीकास्त्र

( My son or I never converted, allegations are false: Dnyandev Wankhede)