सिंधुदुर्गच्या मेडिकल कॉलेजची परवानगी नाकारली, केंद्रीय मंत्री खरा झारीतला शुक्राचार्य, विनायक राऊतांचं नारायण राणेंवर अप्रत्यक्ष टीकास्त्र

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रश्नावरुन राजकारण पुन्हा तापलं आहे. शिवेसना खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केलीय.

सिंधुदुर्गच्या मेडिकल कॉलेजची परवानगी नाकारली, केंद्रीय मंत्री खरा झारीतला शुक्राचार्य, विनायक राऊतांचं नारायण राणेंवर अप्रत्यक्ष टीकास्त्र
विनायक राऊत
Follow us
| Updated on: Oct 31, 2021 | 11:17 AM

सिंधुदुर्ग: जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रश्नावरुन राजकारण पुन्हा तापलं आहे. शिवेसना खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केलीय. वैद्यकीय महाविद्यालय होऊ नये म्हणून या जिल्ह्यातील दिल्लीमध्ये प्रतिनिधित्व करणारा केंद्रीय मंत्री खरा झारीतला शुक्राचार्य असल्याचा आरोप विनायक राऊत यांनी नारायण राणें यांचं नाव न घेता म्हटलं आहे.

विनायक राऊत नेमकं काय म्हणाले?

सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालया बाबतचा खरा झारीतील शुक्राचार्य हा जिल्ह्याचं नवी दिल्लीत प्रतिनिधीत्व करणारा केंद्रीय मंत्री आहे. इतर जी शासकीय वैद्यकीयमहाविद्यालय आहेत सातारा, अलिबाग, पुणे इथल्या वैद्यकीय महाविद्यालयांपेक्षा सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयाच्या पायाभूत सुविधा चांगल्या आहेत. मात्र, सिंधुदुर्गमधील त्या मंत्र्याच्या खासगी वैद्यकीय रुग्णालयावर परिणाम नको म्हणून परवानगी नाकारली जात आहे.

नारायण राणेंकडून मंत्रिपदाचा दुरुपयोग होत असल्याचा आरोप

सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयाबाबत पुन्हा केंद्रीय मेडिकल असेसमेंट रेकींग बोर्ड (MARB) ने त्रुटी काढल्या असून परवानगी नाकारली आहे. मात्र, या सर्व प्रकरणात खरा झारीतला शुक्राचार्य या जिल्ह्यातील दिल्लीमध्ये जे प्रतिनिधित्व करणारे केंद्रीय मंत्री आहेत ते खर्‍या अर्थाने झारीतले शुक्राचार्य असल्याचा घणाघाती आरोप खासदार विनायक राऊत यांनी नाव न घेता नारायण राणेवंर केला आहे. आपल्या मंत्री पदाचा दुरुपयोग करून आणि आपल्या कॉलेजवर त्याचा परिणाम होऊ नये म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मध्ये अडचणी आणायच्या हे काम केंद्रीय मंत्र्याच्या माध्यमातून होतय आणि तोचं खरा झारीतला शुक्राचार्य असल्याचा आरोप करून राऊत यांनी  नारायण राणेवंर जोरदार हल्ला चढवला आहे.

कोर्टात जाऊन परवानगी आणणार

आम्ही दिल्लीत पुन्हा एकदा प्रस्ताव सादर करणार आहोत. जर परवानगी नाकारण्यात आली तर आम्ही कोर्टात जाऊ पण सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयाला परवानगी मिळवणार असल्याचं शिवसेना खासदार विनायक राऊत म्हणाले.

इतर बातम्या:

मलिक आता वानखेडेवर वैयक्तिक आरोप करतायत? यास्मिन वानखेडेंबद्दल फोटो ट्विट करत सवाल

‘आर्यन खाननंतर वेळ मिळाला तर राज्यातील शेतकऱ्यांकडे पाहा’, विनायक मेटेंचा ठाकरे सरकारवर निशाणा

Vinayak Raut slam Narayan Rane over permission of Sindhudurg Medical College issue

Non Stop LIVE Update
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत.
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर.
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका.
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले.....
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले......
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज.
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?.