आपण पुन्हा आदिमानवांच्या दिशेने जात आहोत का?; काँग्रेसची सायकल रॅली

| Updated on: Mar 01, 2021 | 10:50 AM

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात हे सायकल आंदोलन करण्यात येत आहे..(nana patole slams modi government over fuel price hike)

आपण पुन्हा आदिमानवांच्या दिशेने जात आहोत का?; काँग्रेसची सायकल रॅली
काँग्रेसची सायकल रॅली
Follow us on

मुंबई: ‘अक्कड बक्कड बंबे बो, 80, 90 पुरे 100’, ‘आपण पुन्हा आदिमानवांच्या दिशेने प्रवास करत आहोत का?’, असे फलक हातात घेऊन काँग्रेसने इंधन दरवाढीचा अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला. काँग्रेसच्या सर्व मंत्री, आमदार आणि नेत्यांनी आज सायकलवरून प्रवास करत विधान भवन गाठले. यावेळी काँग्रेसचे सर्व बडे नेते उपस्थित होते. (nana patole slams modi government over fuel price hike)

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात हे सायकल आंदोलन करण्यात येत आहे. काँग्रेसचे सर्व मंत्री, आमदार आणि नेते आज सकाळी मंत्रालयासमोरील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर जमला. यावेळी त्यांच्या हातात इंधन दरवाढीचे निषेध नोंदवणारे फलक होते. त्यावर, ‘अक्कड बक्कड बंबे बो, 80, 90 पुरे 100’, ‘आपण पुन्हा आदिमानवांच्या दिशेने प्रवास करत आहोत का?’, असा मजकूर लिहिलेला होता. यावेळी काँग्रेस नेत्यांनी महात्मा गांधींना अभिवादन केल्यानंतर सायकलवरून विधानभवनाच्या दिशेने प्रवास सुरू केला. यावेळी नाना पटोले यांच्यासह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार प्रणिती शिंदे, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्यासह काँग्रेसचे सर्वच आमदार उपस्थित होते.

मोदींनी शेतकऱ्यांना खोटी स्वप्ने दाखवली

यावेळी नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. इंधन दरवाढीचा विरोध करत मोदी सरकार सत्तेत आले. पण याच सरकारने सर्वात जास्त इंधन दरवाढ करून देशातील जनतेची थट्टा केली. मोदी सरकारने शेतकऱ्यांना खोटी स्वप्नही दाखवली, अशी टीका नाना पटोले यांनी केली. महागाईने सर्व सामान्यांचं जगणं मुश्किल झालेलं असताना पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी थंडीमुळे पेट्रोल-डिझेलचे भाव वाढल्याचा दावा केला आहे. खरे तर ही शेतकऱ्यांची थट्टाच आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

इंधनावर कर लावणे ही दरोडेखोरी

डिसेंबर पासून आजपर्यंत तीन महिन्यांच्या कालावधीत गॅस सिंलीडरच्या दरात 200 रुपयांची वाढ केली आहे. 800 रुपयांचे सिंलीडर घेणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. त्यामुळे आमच्या माता भगिणींना पुन्हा चुलीचा आधार घ्यावा लागतो आहे. करांशिवाय आज पेट्रोलची किंमत 32 रुपये 72 पैसे प्रति लिटर आणि डिझेलची किंमत 33 रुपये 46 पैसे प्रति लिटर आहे. पण मोदी सरकारने डिझेलवर 820 टक्के तर पेट्रोलवर 258 टक्के एक्साईज ड्यूटी लावून पेट्रोलचे दर 100 रुपये लिटर वर तर डिझेलचे दर 90 रुपये लिटरपर्यंत वाढवले आहेत. मुंबईत पॉवर पेट्रोलचे दर 100 रुपयांच्या वर गेले आहेत. यासोबतच 2001 ते 2014  या चौदा वर्षाच्या काळात पेट्रोल डिझेलवर प्रति लिटर 1 रुपया सेंट्रल रोड फंड सेस लावला जात होता. 2018 मध्ये याचे नाव बदलून सेंट्रल रोड आणि इन्फ्रास्ट्रक्चर फंड करुन 1 रूपयांवरून तो 18 रु. प्रतिलिटर केला. सध्या पेट्रोल आणि डिझेलवर प्रति लिटर 18 रु. सेंट्रल रोड आणि इन्फ्रास्ट्रक्चर फंडासाठी घेतले जातात. तसेच पेट्रोलवर प्रति लिटर 2.50 तर डिझेलवर प्रति लिटर 4 रुपये कृषी सेस घेतला जातो. एवढ्या मोठ्या प्रमाणात इंधनावर कर लावणे ही दरोडेखोरी असून केंद्रातील भाजप सरकारने ती थांबवावी, अशी मागणीही त्यांनी केली. (nana patole slams modi government over fuel price hike)

 

संबंधित बातम्या:

LIVE | महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून, विरोधक कोणत्या मुद्द्यांवर सभागृह दणाणून सोडणार?

मोदी फारच सरळमार्गी नेते, ते आता काँग्रेसच्या मार्गावर चाललेत: संजय राऊत

अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू, 25 जणांना कोरोनाची लागण; एकही आमदार पॉझिटिव्ह नाही

(nana patole slams modi government over fuel price hike)