पबजी गेम खेळू न दिल्याने 16 वर्षीय मुलाने घर सोडलं

| Updated on: Sep 22, 2019 | 4:40 PM

ऑनलाईन गेम पबजीच्या (PUBG) वेडापायी नवी मुंबईतील एका मुलाने घर सोडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे (Boy left house). या मुलाच्या पालकांनी त्याला पबजी गेम खेळू न दिल्याने रागाच्या भरात त्याने घर सोडलं (Boy left house for PUBG).

पबजी गेम खेळू न दिल्याने 16 वर्षीय मुलाने घर सोडलं
Follow us on

नवी मुंबई : ऑनलाईन गेम पबजीच्या (PUBG) वेडापायी नवी मुंबईतील एका मुलाने घर सोडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे (Boy left house). या मुलाच्या पालकांनी त्याला पबजी गेम खेळू न दिल्याने रागाच्या भरात त्याने घर सोडलं (Boy left house for PUBG). मुलाचं वय 16 वर्ष आहे. मुलाच्या पालकांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. सध्या नवी मुंबई पोलीस या बेपत्ता मुलाचा शोध घेत आहेत (Navi Mumbai Boy Missing).

नवी मुंबईच्या नेरुळ परिसरात बेपत्ता मुलगा त्याच्या कुटुंबियांसोबत राहत होता. रात्री आई-वडील झोपले की तो रात्रभर मोबाईलवर पबजी गेम खेळायचा. त्यावर त्याच्या घरच्यांनी अनेकदा त्याला रागावलं, मात्र तरीही तो ऐकत नव्हता. पबजीच्या वेडापायी तो कॉलेजातही जात नव्हता. गेल्या सोमवारीही हा मुलगा पबजी गेम खेळत असल्याने त्याच्या घरचे त्याला ओरडले. याचा राग मनात ठेवत मुलाने घर सोडलं. त्यानंतर त्याचा अद्यापही पत्ता लागलेला नाही, त्यामुळे त्याच्या घरचे चिंतातूर झाले आहेत.

नवी मुंबई पोलीस सायबर सेलने या मुलाचं पबजी अकाऊंट चेक केलं. तेव्हा तो गेमच्या शेवटच्या लेव्हलपर्यंत पोहचल्याचं समोर आलं. पोलिसांनी त्याच्या काही मित्रांकडेही त्याची चौकशी केली. पबजी गेमच्या माध्यमातून ओळख झालेल्या पुण्याच्या एका तरुणाने त्याला पुण्यातील सायबर कॅफेत नोकरीची ऑफर दिली होती. तिथे त्याला पबजी गेम खेळण्यावर कुठलंही बंधन नसेल असंही त्या तरुणाने सांगितलं होतं, अशी माहिती या मुलाच्या मित्रांनी दिली. सध्या पोलीस या सर्व माहितीच्या आधारावर तपास करत आहे. पण, पबजीच्या वेडापायी पुन्हा एक मुलगा घर सोडून गेल्याने, आतातरी या गेमवर प्रशासनाकडून कुठली कारवाई होईल की नाही, हा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.

संबंधित बातम्या :

पबजी पार्टनरसाठी लाईफ पार्टनरसोबत घटस्फोट

पबजी गेम खेळण्यापासून रोखले म्हणून पत्नीने घटस्फोट मागितला

‘ही जागा पबजी खेळण्यासाठी राखीव आहे’, बदलापुरातील तरुणांचा खोडसाळपणा

PUBG गेमसाठी दहावीच्या विद्यार्थ्याची 50 हजार रुपयांची चोरी

पब्जी खेळण्यात मग्न, पाणी समजून अॅसिड प्यायला!

मोबाईल गेम खेळण्यात भारतीय अव्वल, जगात कितवा क्रमांक?