Ganeshotsav 2020 | नवी मुंबईत गणेश मूर्तींची होम डिलीव्हरी, गर्दी टाळण्यासाठी मूर्तीकारांची शक्कल

| Updated on: Aug 18, 2020 | 11:40 AM

आठ दिवस आधीच नवी मुंबईत गणेशमूर्तींची होम डिलीव्हरी करण्यात येत आहे. (Navi Mumbai Ganpati Idol deliver home before 8 days) 

Ganeshotsav 2020 | नवी मुंबईत गणेश मूर्तींची होम डिलीव्हरी, गर्दी टाळण्यासाठी मूर्तीकारांची शक्कल
Follow us on

नवी मुंबई : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणेशचतुर्थी पूर्वी एक किंवा दोन दिवस आधी गणेशमूर्ती घरी नेण्याची परंपरा यंदा खंडित झाली आहे. गणेश कार्यशाळेत गर्दी झाल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. यामुळे आठ दिवस आधीच नवी मुंबईत गणेशमूर्तींची होम डिलीव्हरी करण्यात येत आहे. (Navi Mumbai Ganpati Idol deliver home before 8 days)

कोरोना काळात गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन शासनाकडून करण्यात येत आहे. त्यामुळे घरी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती आणण्याबरोबरच तिचे गृहसंकुलाशेजारी विसर्जन करण्याचा निर्णय अनेकांनी घेतला आहे.

त्यासोबतच गणरायाच्या आगमनादिवशी किंवा त्याआधी मूर्तीकारांच्या कार्यशाळेत गर्दी होऊ नये, यासाठी नागरिकांनी एक आठवडा आधीच मूर्ती घरी घेऊन जाण्यास सुरुवात केली आहे. तर काही गणेश मूर्तिकारांनी कार्यशाळेत होम डिलीव्हरीचा पर्याय सुद्धा उपलब्ध केला आहे. मात्र त्याचे जादा दर आकरण्यात येतील, असेही सांगण्यात आले आहे.

हेही वाचा – कोकणात जाणाऱ्या विशेष ट्रेनकडे चाकरमान्यांची पाठ, रत्नागिरीत 2 ट्रेनमधून केवळ 27 प्रवाशी उतरले

दरम्यान कोरोनाचे सावट गणेश उत्सावावर आल्याने साध्या पद्धतीने गणेश उत्सव करण्यात येत आहे.  त्याच पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील 65 सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशोत्सव रद्द करण्याचा सकारात्मक निंर्णय घेतला आहे.

नवी मुंबईत जवळपास 320 सार्वजनिक मंडळ आहेत. त्यातील 70 सार्वजनिक मंडळ गणेशोत्सव साजरा करणार नाही, असे माहिती गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष बसुरेश भिलारे यांनी दिली. (Navi Mumbai Ganpati Idol deliver home before 8 days)
संबंधित बातम्या : 
Ganeshotsav 2020 | गणेशोत्सवाच्या नियोजनाविषयी नवी मुंबई पालिकेची बैठक, सार्वजनिक गणेश मंडळांसाठी मार्गदर्शक सूचना
Ganeshotsav 2020 | यंदा गणेशमूर्तींची उंची 4 फुटांपर्यंतच, मुख्यमंत्र्यांकडून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना 10 सूचना