आज सरकार येईल, उद्या सरकार येईल या आशेवर भाजपकडून रोज नव्या विषयांचा रतीब; मलिक यांची खोचक टीका

| Updated on: Jun 21, 2021 | 6:49 PM

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या लेटरबॉम्बनंतर राज्यात पुन्हा शिवसेना-भाजपचं सरकार येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यातच भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेसोबत युती होऊ शकते. (nawab malik)

आज सरकार येईल, उद्या सरकार येईल या आशेवर भाजपकडून रोज नव्या विषयांचा रतीब; मलिक यांची खोचक टीका
नवाब मलिक, राष्ट्रवादी काँग्रेस
Follow us on

मुंबई: शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या लेटरबॉम्बनंतर राज्यात पुन्हा शिवसेना-भाजपचं सरकार येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यातच भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेसोबत युती होऊ शकते, असं विधान करून या चर्चांना हवा दिली आहे. मात्र, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी या चर्चांमधील हवाच काढून घेतली आहे. आज सरकार येईल, उद्या सरकार येईल या आशेवर भाजपकडून रोज नव्या विषयांचा रतीब घातला जातोय, अशी खोचक टीका नवाब मलिक यांनी केली आहे. (nawab malik attacks bjp over various political issues in maharashtra)

नवाब मलिक यांनी मीडियाशी संवाद साधताना भाजपवर हा हल्ला चढवला. भाजप दररोज सरकार येईल या आशेवर नवनवीन विषय समोर आणत आहे. आज सरकार जाणार आहे… उद्या सरकार जाणार आहे… असे भाजप नेते रोजच बोलत आहेत. कुणी काहीही बोलू द्यात राज्यातील आघाडी सरकार पाच वर्षे पूर्ण करेलच, असा विश्वास मलिक यांनी व्यक्त केला. तसेच, महाविकास आघाडी सरकार जाणार… लवकरच कोसळणार ही भाजपने जाहीर केलेली एकही भविष्यवाणी किंवा तारीख खरी ठरत नाहीये, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

सरकार कार्यकाळ पूर्ण करणार

महाविकास आघाडी सरकार हे किमान समान कार्यक्रमावर बनवण्यात आले आहे. सरकार जनहिताची कामे करतंय आणि सरकारच्या कामकाजावर जनता समाधानी आहे. त्यामुळे हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

राष्ट्रावादीची उद्या दिल्लीत बैठक

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यसमितीची उद्या मंगळवारी (22 जून) दिल्लीत बैठक होत आहे. या बैठकीला सर्व निमंत्रित सदस्य आणि परमनंट सदस्य सहभागी होणार आहेत. या बैठकीत विविध अजेंड्यावर चर्चा होणार असल्याचेही त्यांनी सांगितलं.

विरोधी पक्षांची मोट बांधणार

या बैठकीनंतर शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीला आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस, आरजेडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे नेते उपस्थित राहणार आहेत. आगामी लोकसभेच्या अधिवेशनाबाबत यामध्ये चर्चा होणार आहे. शिवाय देशातील राजकीय परिस्थितीवरही चर्चा केली जाणार आहे. संपूर्ण देशातील सर्व विरोधी पक्षांची मोट बांधण्याचे काम उद्यापासून शरद पवार करणार आहेत असं सांगतानाच उद्या मोजक्या पक्षांसोबत चर्चा होणार असून त्यानंतर हळूहळू इतर पक्षांना कसं एकत्र आणता येईल त्याबाबतीत हे नेते बसून ठरवणार आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं. (nawab malik attacks bjp over various political issues in maharashtra)

 

संबंधित बातम्या:

पवार-प्रशांत किशोर यांच्यात पावणे दोनतास खलबतं; विरोधकांच्या मंगळवारच्या बैठकीचा अजेंडा ठरला?

‘राष्ट्रमंच’च्या बॅनरखाली विरोधी पक्ष एकवटणार?, पवारांनी 15 पक्षांची बैठक बोलावली; भाजपविरोधात मोर्चेबांधणी सुरू

प्रशांत किशोर पुन्हा शरद पवारांच्या भेटीला, आता दिल्लीत खलबतं; कुछ तो गडबड है!

(nawab malik attacks bjp over various political issues in maharashtra)