AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: मलाना क्रीम घेऊन बोलल्याने बापूंचे विचार संपणार नाहीत, नवाब मलिकांचा कंगनाला टोला

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अभिनेत्री कंगना रणावत यांनी काढलेल्या उद्गाराचे सर्वत्र पडसाद उमटत आहेत. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी या मुद्द्यावरून कंगनावर जोरदार टीका केली आहे.

VIDEO: मलाना क्रीम घेऊन बोलल्याने बापूंचे विचार संपणार नाहीत, नवाब मलिकांचा कंगनाला टोला
नवाब मलिक
| Edited By: | Updated on: Nov 17, 2021 | 5:06 PM
Share

मुंबई: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अभिनेत्री कंगना रणावत यांनी काढलेल्या उद्गाराचे सर्वत्र पडसाद उमटत आहेत. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी या मुद्द्यावरून कंगनावर जोरदार टीका केली आहे. मलाना क्रीम घेऊन कोणी काही बोलत असेल तरीही बापूंचे विचार संपणार नाही, असा टोला नवाब मलिक यांनी कंगनाला लगावला आहे.

नवाब मलिक यांनी मीडियाशी संवाद साधताना हा टोला लगावला. अशी एक महिला दिवसभर मलाना क्रीम घेऊन बसते व बोलते. तिच्या बोलण्याने महात्मा गांधी यांचे विचार संपणार नाही. जे प्रचारक आहेत, जे अशा लोकांना पुढे करत आहेत त्यांना कळलं पाहिजे की, बापूंचे विचार जगाने स्वीकारले आहेत. त्यामुळे कुणी कितीही प्रयत्न केले तरी यामध्ये यश मिळणार नाही, असं मलिक म्हणाले.

तर ती चूक समजावी

ज्या लोकांनी बापूंची हत्या केली ते पण बापूंना बगल देऊ शकत नाही. बापूंचे विचार देशात, जगात लोकांनी स्वीकारले आहेत. एखादी महिला बापूंच्या विरोधात बोलल्यावर लोकांच्या मनात गैरसमज निर्माण होतील हा कुणाचा समज असेल तर ती चूक आहे, असंही त्यांनी सांगितलं.

खोटा इतिहास सांगण्याचं काम आधीपासूनच सुरू

नियोजनबद्ध पध्दतीने महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू व अनेक स्वातंत्र्यसैनिकांच्या विरोधात वातावरण निर्माण करण्याचे काम आधीपासूनच सुरू आहे. खोटा इतिहास सांगणे, खोटी माहिती उपलब्ध करून देणे असं गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळेच हे लोक अशा पध्दतीने वारंवार असे बोलत असतात, असं त्यांनी सांगितलं.

बोलविता धनी कोण सर्वांना माहीत

कंगना रणावत हिने महात्मा गांधींजींचा अपमान करण्याचे काम केले केले आहे. अहिंसेचा विचार जगाने स्वीकारला आहे. हिंसेने कुठलेही विषय सुटत नाही. त्यामुळे ठरवलं तर अहिंसेच्या मार्गाने काहीही प्राप्त करु शकतो. मात्र तिने बापूंचा अपमान का केला आणि तिचा बोलविता धनी कोण आहे हे देशाला माहीत आहे, असंही ते म्हणाले.

वेडे लोकं बरळत असतात

दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनीही कंगनावर टीका केली आहे. . वेडे लोकं बरळत असतात. ते का बरळतात? ते कोणत्या नशेत असतात? त्यांना या नशेचा पुरवठा कोण करतं? एनसीबीने त्याचा तपास करावा ही मागणी आहे, असा टोला राऊत यांनी कंगनाला लगावला. चीनने आपल्या गालावर थप्पड मारली आहे. चीन लडाखमध्ये घुसला आहे. चीन अरुणाचल प्रदेशात घुसला आहे. तरीही आम्ही दुसरा गाल पुढे केला आहे. काश्मीरमध्ये पंडितांच्या हत्या होत आहेत. या देशात बरंच काही चाललं आहे. हे त्या मॅडमला माहीत असलं पाहिजे. आज देशाची अवस्था काय आहे हे त्यांना माहीत पाहिजे, असा टोलाही त्यांनी लगावला.

संबंधित बातम्या:

Photo : जमलेल्या माझ्या तमाम… शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे एक झंझावात!

दिल्लीतला मोठा काँग्रेस नेता राष्ट्रवादीच्या गळाला, पवार म्हणतात, आम्हाला आधी घर पक्कं करावं लागेल!

Maharashtra News LIVE Update | देशाला भाजपची हुकूमशाही नको आहे, त्यामुळे लोकांना पर्याय हवा आहे – शरद पवार

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.