Nawab Malik : हसीना पारकरचा बॉडीगार्ड, ड्रायव्हर सलीम पटेल राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, नवाब मलिकांचा ईडीला खळबळजनक जबाब

दुसरीकडे राष्ट्रवादी मात्र नवाब मलिकांना राजीनामा न घेण्यावर ठाम आहे. अशातच आता प्रकरणात आणखी एक मोठी अपडेट आली आहे. यात नवाब मलिक यांनी ईडीला (ED) एक खळबळजनक जबाब दिला आहे.

Nawab Malik : हसीना पारकरचा बॉडीगार्ड, ड्रायव्हर सलीम पटेल राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, नवाब मलिकांचा ईडीला खळबळजनक जबाब
हसीना पारकरचा बॉडीगार्ड, ड्रायव्हर सलीम पटेल राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, नवाब मलिकांचा ईडीला खळबळजनक जबाबImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 24, 2022 | 10:41 PM

मुंबई : मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) गेल्या अनेक दिवसांपासून जेलमध्ये आहेत. गोवावाला कम्पाउंड मनी लौडरिंग प्रकरणात नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे. त्यामुळे राज्याचं राजकारण गेल्या काही दिवसांपासून पेटून उठलं आहे. भाजपकडून यावरूनच महाविकास आघाडीला घेरण्याचा प्रयत्न सुरू आहे. नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजप (BJP) महाविकास आघाडीवर सतत दबाव निर्माण करण्यावर भर देत आहे. दाऊदशी संबंध असणाऱ्या मंत्र्याला मुख्यमंत्री पाठीशी घालत आहेत. हे सरकार वसुली सरकार आहे, अशी टीका वारंवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांकडून करण्यात येत आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी मात्र नवाब मलिकांना राजीनामा न घेण्यावर ठाम आहे. अशातच आता प्रकरणात आणखी एक मोठी अपडेट आली आहे. यात नवाब मलिक यांनी ईडीला (ED) एक खळबळजनक जबाब दिला आहे.

मलिक यांच्या जबाबात खळबळजक माहिती

हसीना पारकरचा बॉडीगार्ड आणि ड्रायव्हर म्हणून काम पाहणारा सलीम पटेल राष्ट्रवादीचा कार्यकर्ता होता, असा जबाब मलिक यांनी ईडीला दिल्याची माहिती समोर आली आहे. 2002 सालापासून मी सलीम पटेलला ओळखत होतो. तो राष्ट्रवादीचा कार्यकर्ता होता आणि आणि राष्ट्रवादीचे तत्कालीन मुंबई अध्यक्ष चंद्रकांत त्रिपाठी यांच्या नेतृत्वात तो काम करत होता. अशी नवाब मलिक यांनी ईडीला दिलेल्या जबाब टीव्ही 9 च्या हाती लागली आहे. तसेच नवाब मलिक यांनी जबाबात गोवावाला कंपाऊड संदर्भात झालेल्या व्यवहाराच्या बऱ्याच गोष्टी माहिती नव्हत्या असेही मलिकांनी म्हटलं आहे. गोवावाला कम्पाउंडच्या संबंधित व्यवहारात नवाब मलिक यांचे भाऊ अस्लम मलिक यांचाही महत्वाचा रोल आहे.

कुणाला किती पैसे दिले?

2005 साली मलिक यांनी सलीम पटेल विषयी लोकांना विचारलं त्यावेळी त्यांना त्याची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचं सांगण्यात आलं असेही म्हटलंय. सलीम पटेल हा हसीना पारकरचा अत्यंत जवळचा निकटवर्तीय होता. हसीना पारकरने केलेल्या जवळपास सर्व व्यवहाराची त्याला कल्पना असायची. गोवावाला कम्पोउंड संदर्भात झालेल्या व्यवहारात सलीम पटेलला नवाब मलिक यांच्याकडून 15 लाख मिळले होते. यातील दुसरा आरोपी सरदार शाहवली खान याला 5 लाख, हसीना पारकरला रोख स्वरूपात 5 लाख आणि चेकमध्ये 5 लाख असे पैसे देण्यात आले होते. हे पैसे नवाब मलिक यांचा मुलगा फराझ मलिक आणि भाऊ अस्लम मलिक यांच्यासमोर देण्यात आले होते, असाही जबाब मलिक यांनी दिला आहे. त्यामुळे आता यवरूनही जोरदार राजकारण तापण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा
Non Stop LIVE Update
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.