खान्देशातील बडा चेहरा, राष्ट्रवादीचे प्रतोद अनिल भाईदास पाटील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

| Updated on: Mar 29, 2023 | 6:00 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल भाईदास पाटील यांची अचानक प्रकृती बिघडल्याची बातमी समोर आली आहे. अनिल पाटील यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना तातडीने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

खान्देशातील बडा चेहरा, राष्ट्रवादीचे प्रतोद अनिल भाईदास पाटील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
Follow us on

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या दिग्गज नेत्यांवर अनेक संकट ओढावताना दिसत आहेत. नुकतंच महाराष्ट्राचे मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांना कोरोनाची (Corona) लागण झाल्याची माहिती समोर आली. त्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आलेली. त्यानंतर आता पुन्हा तशीच काहीशी घटना समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि खान्देशाच्या राजकारणातील बडा चेहरा असलेला नेता अनिल भाईदास पाटील (Anil Bhaidas Patil) यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे.

अनिल भाईदास पाटील हे 2019च्या विधानसभा निवडणुकीत निवडून आले होते. अतिशय अटीतटीची ती लढत ठरली होती. याशिवाय अनिल पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतोद देखील आहे. खान्देशातील राजकारणात त्यांनी एक चांगलं स्थान मिळवलं आहे. त्यांच्या अमळनेर मतदारसंघात त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. त्यांना 2019च्या विधानसभा निवडणुकीत पाटील समाजाने चांगला प्रतिसाद दिला होता, अशी चर्चा निवडणुकीनंतर समोर आली होती.

विधानसभेच्या 2019च्या निवडणुकीनंतर अनिल भाईदास पाटील हे नाव संपूर्ण खान्देशात पोहोचलं होतं. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात महत्त्वाची भूमिका निभावतात. याशिवाय अमळनेरात लोकपयोगी कामांसाठी ते पुढाकार घेत असल्याची चर्चा असते. पण आज त्यांची अचानक प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे.

अनिल पाटील यांची सध्या प्रकृती स्थिर

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतोद आणि आमदार अनिल पाटील यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आमदार अनिल पाटील यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या पोटावर दोन तास शस्त्रक्रिया करण्यात आलीय.

डॉक्टरांकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्यांना सध्या आरामाची आवश्यकता आहे. पाटील बरे झाली की प्रसारमाध्यमांसमोर येऊन प्रतिक्रिया देतीलच, पण त्याआधी त्यांच्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांकडून पाटील यांची प्रकृती लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना केली जात आहे.