
दोन दिवसांपूर्वी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी एका घटनेने सगळ्या मुंबापुरीला हादरवून सोडलं. असं काही घडेल, असं स्वप्नातही कोणाला वाटलं नव्हतं. सगळीकडे दसऱ्याचा उत्साह होता. लोक एकमेंकाना दसऱ्याच्या शुभेच्छा देत होते. फटाक्यांची आतषबाजी चाललेली. देवीच्या विसर्जना मिरवणुका निघालेल्या. शनिवार रात्रीचे 9 वाजलेले. सगळीकडे वातावरणात उत्साह होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी वांद्रे पूर्वेला असलेल्या आपल्या निर्मल नगर कार्यालयातून बाहेर पडलेले. त्याचवेळी बाबा सिद्दीकी यांच्या कार्यालयाजवळ असलेल्या राम मंदिराजवळ एक ऑटोरिक्षा आली. तीन जण त्यातून उतरले. ओळख लपवण्यासाठी तिघांनी आपले चेहरे कपड्याने झाकलेले. त्यांनी त्यांच्याजवळ असलेली बंदुक बाहेर काढली व समोर उभ्या असलेल्या बाबा सिद्दीकी यांच्यावर धडाधड तीन गोळ्या झाडल्या. बाबा सिद्दीकी तिथेच रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. आरोपींनी गोळ्या झाडल्या त्यावेळी देवीची विसर्जन मिरवणूक सुरु होती. त्यामुळे गोळीबाराचा आवाज ऐकू आला नाही. आरोपींनी त्या स्थितीचा फायदा उचलला. हा सगळा प्रकार रात्री 9.15 ते 9.30 दरम्यान घडला. बाबा सिद्दीकी यांना लगेच जवळच्या लिलावती रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं. पण तो पर्यंत उशिरा झालेला. बाबा सिद्दीकी यांच्या...