Sharad Pawar Birthday : ‘शरद पवार हे पॉवर हाऊस, त्यांचा नेम अचूक’

| Updated on: Dec 12, 2021 | 12:16 PM

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) हे पॉवर हाऊस आहेत. त्यांचा नेम अचूक असतो. मराठवाडा विद्यापीठ नामकरण(Marathwada University), महिलांचं आरक्षण (Womens Reservation) तसेच महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) निर्माण करण्याचा निर्णय आदी महत्त्वाचे निर्णय त्यांनी घेतले, यामुळे परिवर्तन झालं. , अशी स्तुतीसुमनं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (NCP Leader Jayant Patil) यांनी उधळली.

Sharad Pawar Birthday : शरद पवार हे पॉवर हाऊस, त्यांचा नेम अचूक
शरद पवार
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) हे पॉवर हाऊस आहेत. त्यांचा नेम अचूक असतो. त्यांच्या निर्णयामुळे परिवर्तन होतं, हा इतिहास आहे. महाराष्ट्रात, देशात माणसं कशी जोडायची, हे पवारांनी शिकवलं, त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा, अशी स्तुतीसुमनं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (NCP Leader Jayant Patil) यांनी उधळली.

‘2024चा नाही, त्यापुढचा विचार करा’
शरद पवार यांचा आज 81वा वाढदिवस (Sharad Pawars Birthday) आहे. यानिमित्त नेहरू सेंटर(Nehru Centre)मध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात जयंत पाटील बोलत होते. या कार्यक्रमात विविध नेते उपस्थित होते. ते म्हणाले, की विचारांची लढाई उभी करायची असेल तर गावागावात जाऊन विद्यार्थ्यांचं, तरुणांचं मार्गदर्शन घ्यावं. 184 विधानसभा मतदारसंघात पोहोचलो. विद्यार्थी राष्ट्रवादीला आम्ही एवढेच सांगतो, की 2024चा विचार करू नका. त्यापुढचा विचार करा. लोकापर्यंत पोहोचण्यासाठी तळागाळातल्यांशी संवाद साधावा. काँग्रेस (Congress) पक्षानं सेवादल (Sevadal)नावाची संघटना स्थापन केली. महात्मा गांधीं(Mahatma Gandhi)चा विचार त्यामागे होता.

‘परिवर्तन झालं’
मराठवाडा विद्यापीठ नामकरण(Marathwada University), महिलांचं आरक्षण (Womens Reservation) तसेच महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) निर्माण करण्याचा निर्णय आदी महत्त्वाचे निर्णय त्यांनी घेतले, यामुळे परिवर्तन झालं. देशातल्या कोणत्याही नेत्याला त्यांचं मार्गदर्शन घ्यावं लागतं, असं ते म्हणाले.

‘जनता दरबार सुरू करणार’
राज्यातला सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास यावा 2 डिसेंबर ते 11 डिसेंबरदरम्यान शिबिरं घेतली. सर्वांनी मदत केली. वैचारिकदृष्ट्या देवाणघेवाण झाली. 30 ऑक्टोबरपासून पक्षनोंदणी सुरू झाली. अत्यंत चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता 1 जानेवारीपासून डिजिटल मेंबरशिप (Digital Membership) सुरू करणार आहोत. आता महाराष्ट्रच नाही, तर देशातल्या विविध ठिकाणी ज्यांना पक्षाचं सदस्य व्हायचं आहे, त्यांनी मोबाइल क्रमांकावर मिस्ड कॉल (Missed Call) दिल्यास सदस्य होता येईल, अशी माहिती त्यांनी दिली. 1 जानेवारीनंतर कोरोनाची स्थिती पाहता जनता दरबार सुरू करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. अर्बन सेल वंदना चव्हाण (Vandana Chavan) यांनी तयार केला. राष्ट्रवादीकडून अनेकांना अपेक्षा आहेत. ज्याला तिकीट हवं असेल त्यांनी क्रियाशील असायला हवं. महिलांना अधिक प्राधान्य देण्याचा आमचा प्रयत्न असेल.

‘ओबीसी आरक्षणाच्या बाजुने’
मराठा आरक्षण (Maratha Reservation) व ओबीसी आरक्षण (OBC Reservation) यासंबंधी न्यायालयानं वेगळे निर्णय दिले. यामागे काय आणि कोण असा सवाल त्यांनी केला. महाविकास आघाडीचं धोरण मराठा, ओबीसींना आरक्षण देण्याचं असल्याचं त्यांनी सांगितलं.

‘पवारांनी 25 वर्षांपूर्वी सांगितलं ते आम्हाला 2 वर्षांपूर्वी समजलं, राऊतांचा टोला; आता दरेकर म्हणाले, येणारा काळच सांगेल

Alliance | मुंडे असते तर युती कायम राहिली असती, शिवसेना नेते संजय राऊत यांचे मोठे विधान; नव्या राजकीय चर्चेला उधाण

Pawar| पवार हवेत गप्पा मारणारे नव्हेत, यशवंतरावानंतर महाराष्ट्राला लाभलेले सर्वात मोठे दृष्टे नेतृत्व; राऊतांकडून कौतुकाचा वर्षाव