AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाविकासआघाडीचा आणखी एक मंत्री अडचणीत; जितेंद्र आव्हाडांचा सीडीआर काढणार

गेल्यावर्षी 8 एप्रिलला जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर एका अभियंत्याला बेदम मारहाण करण्यात आली होती. | Jitendra Awhad

महाविकासआघाडीचा आणखी एक मंत्री अडचणीत; जितेंद्र आव्हाडांचा सीडीआर काढणार
Jitendra Awhad
| Updated on: Mar 31, 2021 | 8:25 AM
Share

मुंबई: अंबानी स्फोटक प्रकरण आणि पोलीस दलातील अधिकाऱ्यांसह मंत्र्यांवर झालेल्या आरोपांमुळे अगोदरच घायाकुतीला आलेल्या महाविकासआघाडी सरकारच्या अडचणीत आणखी भर पडण्याची शक्यता आहे. कारण, आता न्यायालयाने जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्याविरुद्धच्या एका प्रकरणात त्यांच्या मोबाईल फोनचा संपर्क तपशील नोंद (सीडीआर) काढण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. (Mumbai HC ask for CDR and SDR of NCP leader Jitendra Awhad)

गेल्यावर्षी 8 एप्रिलला जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर एका अभियंत्याला बेदम मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांवर गुन्हे दाखल केले होते. मात्र, जितेंद्र आव्हाड यांना आरोपी करण्यात आले नव्हते. त्यामुळे मारहाण झालेले अभियंता अनंत करमुसे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणाची केंद्रीय गुन्हे अन्वेषण (CBI) विभागाकडून चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली होती.

उच्च न्यायालयात मंगळवारी झालेल्या सुनावणीवेळी न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या खंडपीठाने पोलिसांना याप्रकरणातील सीडीआर जपून ठेवण्याचे आदेश दिले. जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या बंगल्यावर तैनात असलेल्या पोलिसांचा गेल्यावर्षीच्या मार्च महिन्यापासूनचा संपर्क तपशील नोंद (सीडीआर) आणि ग्राहक तपशील नोंद (एसडीआर) मिळवण्याचे व जपून ठेवा, अशा सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत.

नेमकं प्रकरण काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 एप्रिल रोजी रात्री 9 वाजून 9 मिनिटांनी दिवे लावण्याचं आवाहन केलं होतं. मोदींच्या आवाहनानंतर जितेंद्र आव्हाड यांनी त्यावर सडकून टीका केली. त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर या तरुणाने आव्हाडांबद्दल सोशल मीडियावर एक आक्षेपार्ह पोस्ट टाकली. याचा राग मनात धरुन जितेंद्र आव्हाड यांच्या सुरक्षारक्षकांनी बंगल्यावर नेवून त्यांच्यासमोर अमानुष मारहाण केली. यावेळी जितेंद्र आव्हाड हेही त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी मला ती पोस्ट डिलीट करायला लावली. त्यानंतर मी ही पोस्ट चुकून केली आहे, त्याबद्दल माफी मागतो असा व्हिडीओही माझ्याकडून रेकॉर्ड करुन घेतला, असा आरोप तरुणाने केला आहे. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.

मंत्री मंडळातून बडतर्फ करा, फडणवीसांची मागणी

हे प्रकरण त्यावेळी प्रचंड तापले होते. भाजपचे प्रमुख नेते अभियंता अनंत करमुसे यांना भेटायला गेले होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांनी जितेंद्र आव्हाडांवर सडकून टीका केली होती. तसेच जितेंद्र आव्हाडांना मंत्री मंडळातून बडतर्फ करा, अशी मागणी फडणवीसांनी केली होती.

संबंधित बातम्या:

त्याला ओळखतही नाही, अभियंत्याला अमानुषपणे मारहाण केल्याचा आरोप मंत्री जितेंद्र आव्हाडांनी फेटाळला

(Mumbai HC ask for CDR and SDR of NCP leader Jitendra Awhad)

मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....