Rohit Pawar: मंत्र्यांच्या एका चहापानाचा खर्च यापेक्षा अधिक… शेतकर्‍यांच्या तुटपुंज्या मदतीवरुन रोहित पवार भडकले, म्हणाले ही तर अन्नदात्याची थट्टाच

Rohit Pawar on Farmers aids Relief: काल राज्य सरकारने अग्रीम रक्कम म्हणून शेतकऱ्यांना 5,000 रुपयांची मदत जाहीर केली. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

Rohit Pawar: मंत्र्यांच्या एका चहापानाचा खर्च यापेक्षा अधिक... शेतकर्‍यांच्या तुटपुंज्या मदतीवरुन रोहित पवार भडकले, म्हणाले ही तर अन्नदात्याची थट्टाच
शेतकऱ्यांसाठीच्या अग्रीम मदतीवरून आमदार रोहित पवार यांचा सरकारवर निशाणा
| Updated on: Oct 15, 2026 | 8:16 AM

Rohit Pawar on Farmers aids Relief: काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळात होरपळत असलेल्या शेतकऱ्यांना मदत जाहीर केली. तसेच दुष्काळी उपाय योजनांची माहिती दिली. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ही रक्कम मिळणार आहे. राज्यातील 34 जिल्ह्यांमधील 305 दुष्काळग्रस्त तालुक्यातील अंदाजे 1.25 कोटी शेतकऱ्यांना त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे. दरम्यान राज्य सरकारने काल जाहीर केलेल्या 5,000 रुपयांच्या अग्रीम रक्कमेवर, मदतीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी तोंडसुख घेतले आहे. ही तुटपुंजी मदत असल्याची टीका त्यांनी केली आहे. याविषयीचे ट्विट त्यांनी सोशल मीडिया खात्यावरून केले आहे.

ही तर अन्नदात्याची चेष्टाच

Loading...

“दुष्काळाच्या आगीत शेतकरी होरपळून निघत असल्याने शेतकऱ्यांना हेक्टरी किमान 1 लाख रुपये, तर शेतमजुरांना 25,000 रुपये मदत देण्याची आमची मागणी आहे. पण सरकारने अग्रीम रक्कम म्हणून केवळ 5,000 रुपयांवर शेतकऱ्यांची बोळवण केली. नेत्यांच्या आणि मंत्र्यांच्या एका चहापानाचा खर्चही यापेक्षा कितीतरी मोठा आहे… आज शेतीचा मशागत खर्चच हेक्टरी 30 ते 50 हजार रुपयांवर गेलाय आणि अशा परिस्थितीत जाहिरातींवर कोट्यवधींची उधळपट्टी करणारं हे सरकार 5 हजार रुपयांचं चॉकलेट शेतकऱ्यांच्या हातावर टेकवत असेल, तर अन्नदात्याची अशी चेष्टा करताना सरकारला लाज कशी वाटत नाही?” अशी टीका रोहित पवार यांनी एक्स हँडलवरून केलेल्या पोस्टमधून केली आहे.

अन्यथा मंत्र्यांना फिरू देणार नाही

“हा बळीराजाचा केवळ अपमानच नाही, तर त्याच्या परिस्थितीची क्रूर थट्टा आहे! सरकारने शेतकऱ्यांना मदत म्हणून हेक्टरी १ लाख रुपयांपैकी अग्रीम रक्कम म्हणून 30 ते 35 हजार रुपये आणि शेतमजुरांना प्रतिकुटुंब 25 हजार रुपयांपैकी अग्रीम रक्कम म्हणून 10 हजार रुपये द्यावेत. अन्यथा, लोक नेत्यांना आणि मंत्र्यांना दिवाळी साजरी करू देणार नाहीत आणि गावातही फिरू देणार नाही.” असा इशारा सुद्धा रोहित पवार यांनी सरकारला दिला आहे.

शेतकऱ्यांना मदतीसाठी 6 हजार कोटींची तरतूद

राज्य सरकारने राज्यातील 305 दुष्काळग्रस्त तालुक्यातील 1 ते 1.25 कोटी शेतकऱ्यांना मदतीचा हात पुढे केला आहे. त्यानुसार पात्र शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 5,000 रुपयांची मदत मिळेल. ही रक्कम दिवाळीपूर्वीच त्यांच्या बँक खात्यात जमा होईल. या योजनेसाठी राज्य सरकारने 6 हजार कोटींची तरतूद केली आहे. ऐन दिवाळीत दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us