VIDEO | रोहित पवारांनी ‘आरे’त काय काय केलं? झाड लावलं, रिक्षातून सफारी आणि क्रिकेटचे फटके

| Updated on: Feb 11, 2021 | 10:01 AM

रिक्षा चालवत रोहित पवारांनी आरे कॉलनीची सैर केली. त्यानंतर झाड लावून रोहित पवारांनी पर्यावरण बचतीचा संदेश दिला (Rohit Pawar in Aarey Colony)

VIDEO | रोहित पवारांनी आरेत काय काय केलं? झाड लावलं, रिक्षातून सफारी आणि क्रिकेटचे फटके
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार आणि युवा नेते रोहित पवार (Rohit Pawar) यांनी आज आरेच्या जंगलात रपेट मारली. पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक रहिवाशांची संवाद साधत रोहित पवारांनी आरे परिसरातील प्रश्नांचा आढावा घेतला. रिक्षा चालवत रोहित पवारांनी आरे कॉलनी भागात सफारी केली. त्यानंतर झाड लावून रोहित पवारांनी क्रिकेटचे फटकेही लगावले. (NCP MLA Rohit Pawar in Aarey Colony)

पर्यावरणप्रेमींची रोहित पवारांकडे मागणी

मेट्रो कारशेड आरेच्या जंगलात नसावी, अशी मागणी करत पर्यावरणप्रेमींनी आरे जंगल वाचवण्यासाठी आंदोलन केलं होतं. त्यांच्यावर केसेस दाखल झाले आहेत. स्थानिक आदिवासींच्या घराच्या प्रश्नांवर सरकारच्या SRA योजना राबवत आहेत. ती थांबवली गेली पाहिजे, अशी मागणी पर्यावरणप्रेमींनी यावेळी रोहित पवारांकडे केली.

“केंद्र सरकारने अहंकार ठेवू नये”

रोहित पवार यांनी ‘वॉक द टॉक’च्या संवादांमध्ये पर्यावरणप्रेमी, आदिवासी यांना आपण मार्ग निश्चित काढू असे आश्वासनही दिलं. रोहित पवार यांनी आश्वासन दिलं की राज्य सरकार आरे जंगल वाचवणार आणि त्यासाठी इथे आपण झाड लावलं आहे. “मेट्रो कारशेड संदर्भात निश्चित मार्ग काढू, पण केंद्र सरकारने मेट्रोच्या कारशेडचं राजकारण करु नये. राज्य सरकारशी सहकार्य करावं. कुठल्याही पद्धतीचा अहंकार याबाबतीत ठेवू नये” अशी टीकाही रोहित पवार यांनी यावेळी केली.

रोहित पवार यांचे वृक्षारोपण

रिक्षा चालवत रोहित पवारांनी आरे कॉलनीची सैर केली. त्यानंतर झाड लावून रोहित पवारांनी पर्यावरण बचतीचा संदेश दिला. याशिवाय व्हॉलिबॉल, क्रिकेटचे खेळून रोहित पवारांनी आनंदही लुटला.

रोहित पवारांनी व्हॉलीबॉल खेळण्याचा आनंद लुटला

रोहित पवारांची फटकेबाजी

आरे कॉलनीत रिक्षा चालवत सैर

यापूर्वीही आमदार रोहित पवार यांनी मुंबईतील वरळीत नाईट आऊट केलं होतं. स्थानिक कोळी, मच्छिमार बांधव, बॅंडवाले यांच्याशी रोहित पवारांनी संवाद साधला होता. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात रात्रीच्या वेळेस मारलेला फेरफटका रोहित पवारांनी सोशल मीडियावर शब्दबद्ध केला होता.

पाहा व्हिडीओ :

 

 

संबंधित बातम्या :

अजित पवारांची कार्यपद्धत फॉलो, रोहित पवार पहाटे चार वाजता APMC मार्केटमध्ये

आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात रोहित पवारांचं नाईट आऊट

(NCP MLA Rohit Pawar in Aarey Colony)