तासाभरापूर्वी संजय राऊत भेटले, आता पवार गृहमंत्री वळसे पाटलांच्या भेटीला, मुंबई पोलीस आयुक्तांनाही बोलावलं, हालचालींना वेग

| Updated on: Nov 09, 2021 | 11:40 AM

शिवसेना नेते संजय राऊत यांच्याशी आज सकाळी जवळपास तासभर चर्चा केल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत. विशेष म्हणजे पवार आणि दिलीप वळसे पाटील यांच्या भेटीवेळी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे हजर असणार आहे.

तासाभरापूर्वी संजय राऊत भेटले, आता पवार गृहमंत्री वळसे पाटलांच्या भेटीला, मुंबई पोलीस आयुक्तांनाही बोलावलं, हालचालींना वेग
अनिल देशमुख आणि शरद पवार
Follow us on

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याशी आज सकाळी जवळपास तासभर चर्चा केल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांच्या (Dilip Walse Patil) भेटीसाठी रवाना झाले आहेत. विशेष म्हणजे पवार आणि दिलीप वळसे पाटील यांच्या भेटीवेळी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे (Mumbai CP Hemant Nagrale) हजर असणार आहे. कारण शरद पवार यांनी या भेटीसाठी पोलिस आयुक्त नगराळे यांनाही निमंत्रण दिलं आहे. या भेटीत मुंबईतील ड्रग्ज प्रकरण, हायव्होल्टेज आर्यन खान ड्रग्ज केस, अनिल देशमुख अटक प्रकरण या विषयांवर चर्चा होणार असल्याची माहिती कळतीय. गेल्या दोन तासात मुंबईत राजकीय हालचालींना वेग आला आहे.

सकाळी 9 ते 11.30, मुंबईत अडीज तासांत तीन मोठ्या घडामोडी

आज सकाळी 9 वाजताच्या दरम्यान संजय राऊत शरद पवार यांची भेट घेण्यास सिल्वर ओकवर दाखल झाले. सपत्निक त्यांनी पवारांची भेट घेतली. सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं गेलं. दिवाळीच्या शुभेच्छांची आदान प्रदान झाल्यावर या भेटीत महत्त्वाच्या राजकीय विषयांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. जवळपास तासभर झालेल्या भेटीनंतर राऊत सिल्वर ओकवरुन निघाले. त्यानंतर पवारही वळसे पाटलांच्या भेटीसाठी रवाना झाले.

शरद पवारांनी वळसे पाटलांच्या भेटीवेळी मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनाही निमंत्रण दिलं आहे. या भेटीत खूप महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या क्रुझ ड्रग्ज केस, माजी गृहमंत्री अनिल देशमुख अटक प्रकरण या गोष्टी चर्चेत आहेत. समीर वानखेडे विरुद्ध नवाब मलिक यांचा सामना दररोज सुरु आहे. पत्रकार परिषदांच्या सिलसिल्याच्या माध्यमातून दररोज आरोप प्रत्यारोपांची राळ उडतीय. याच सगळ्या अनुषंगाने पवार-वळसे पाटील- मुंबई पोलीस आयुक्त यांच्या भेटीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

भेटीत कोणत्या विषयांवर चर्चा?

गेल्या महिनाभरापासून आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाने महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे. दररोज नवनवे खुलासे, दावे समोर येत आहेत. त्यात मंत्री नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात कलगीतुरा सुरु आहे. मलिक दररोज नवनवे दावे करुन पुरावे सादर करतायत. मुंबई पोलिसांनीही वानखेडे यांना समन्स पाठवलं आहे. या सगळ्या अनुषंगाने पवार गृहमंत्र्यांची चर्चा करणार आहेत. तसंच मुंबई पोलिसांचाही या प्रकरणात महत्त्वाचा रोल असल्याने खुद्द पोलिस आयुक्तांशी पवार चर्चा करतील.

दुसरीकडे ईडीच्या अटकेत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याभोवतीचं संशयाचं धुकं आता सरलं आहे. कारण मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी देशमुखांविरोधात माझ्याकडे कोणतेही पुरावे नाही, असं चांदिवाल आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या ईडीच्या कोठडीत आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे आरोप परमबीर सिंग यांनी केले होते. गेले अनेक दिवस ते फरार होते. पण 1 तारखेला ते ईडीच्या कार्यालयात हजर झाले. 13 तास मॅरेथ़ॉन चौकशी झाली आणि नंतर ईडीने त्यांच्यावर अटकेची कारवाई केली. पण त्यानंतर या प्रकरणात मोठा ट्विस्ट आहे.

चांदीवाल आयोगाला प्रतिज्ञापत्र सादर करत माझ्याकडे अनिल देशमुख यांच्याविरोधात कोणतेही पुरावे नाहीत. आता माझं कोणतंही म्हणणं नाही, असं प्रतिज्ञापत्रात परमबीर सिंह यांनी नमूद केलं. म्हणजेच आरोप करणारे परमबीर सिंग यांनीच पुरावे नसल्याचं म्हटल्याने देशमुखांना मोठा दिलासा मिळाला.

हे ही वाचा :

मेरे ख़याल को बेड़ी पहना नहीं सकते ! नवाब मलिक यांचं सूचक ट्विट, पत्रकार परिषदेत कोणता धमाका?

संजय राऊत सपत्नीक सिल्वर ओकवर, शरद पवारांच्या भेटीचं कारण काय?