संजय राऊत सपत्नीक सिल्वर ओकवर, शरद पवारांच्या भेटीचं कारण काय?

संजय राऊत सपत्नीक सिल्वर ओकवर, शरद पवारांच्या भेटीचं कारण काय?
संजय राऊत आणि शरद पवार

शिवसेना नेते खासदार संजय राऊत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्वर ओकवर दाखल झाले आहेत.संजय राऊत सपत्निक दिवाळीनिमित्त सदिच्छा भेट घेण्यासाठी जात असल्याची माहिती आहे. सकाळी 9 च्या दरम्यान संजय राऊत पवारांच्या सिल्वर ओकवर दाखल झाले आहेत. 

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Akshay Adhav

Nov 09, 2021 | 9:32 AM

मुंबई :  शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्वर ओकवर दाखल झाले आहेत.संजय राऊत सपत्निक दिवाळीनिमित्त सदिच्छा भेट घेण्यासाठी जात असल्याची माहिती आहे. सकाळी 9 च्या दरम्यान संजय राऊत पवारांच्या सिल्वर ओकवर दाखल झाले आहेत.

पवारांना प्रत्यक्ष भेटून दीपावलीच्या शुभेच्छा देणार

शरद पवार आणि कुटुंबांना प्रत्यक्ष भेटून राऊत दीपावलीच्या शुभेच्छा देतील. दीपावलीच्या काळात शरद पवार आणि त्यांचं संपूर्ण कुटुंबीय बारामतीला होते. त्यामुळे दिवाळीच्या काळात राऊतांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देता आल्या नाहीत. पवार आता मुंबईत आलेले आहेत. आज अगदी सकाळी 9 च्या आसपास संजय राऊत सिल्वर ओकवर दाखल झाले.

आर्यन खान प्रकरणावर चर्चा?

या भेटीत इतरही राजकीय मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याची माहिती आहे. कारण आर्यन खान प्रकरणावरती नबाव मलिक यांनी ट्रेलर दाखवला. आता त्याची पुढची पटकथा मी सांगणार, असं संजय राऊत म्हणाले होते. आता राऊत आज पवारांची भेट घेत आहेत. या भेटीत आर्यन खान प्रकरणावरतीही चर्चा होऊ शकते, अशी माहिती कळतीय.

दो कौडी के लोग, सकाळी केलेल्या ट्विटमधून राऊतांचा टोला कुणाला?

कॉर्डिलिया क्रुझवरील ड्रग्ज पार्टीच्या मुद्द्यावरुन महाविकासआघाडी आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरु असतानाच आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी सूचक ट्विट केले आहे. उस जगह हमेशा, खामोश रहा करो जहाँ, दो कौडी के लोग, अपना गुण गाते होते हो, असे या ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी ‘दो कौडी के लोग’, असा टोला नेमका कोणाला हाणला आहे, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

ड्रग्ज पार्टी प्रकरणात अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (NCB) बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन याच्यावर कारवाई केल्यापासून दररोज नवनवे खुलासे होताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी आतापर्यंत एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. याप्रकरणाची इंटरव्हलनंतरची पटकथा मी लिहणार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले होते. त्यामुळे संजय राऊत यांच्या प्रत्येक वक्तव्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेले असते. परिणामी संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटवरुन तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

(Shivsena MP Sanjay Raut Meet NCP Sharad  pawar At Silver oak)

हे ही वाचा :

जहाँ दो कौडी के लोग…. संजय राऊतांचं सूचक ट्विट

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें