AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nilesh Rane : ‘अशी भीक मागायची पद्धत…’ संजय राऊतांच्या ईडीच्या वक्तव्यावरून निलेश राणेंचा संजय राऊतांवर वार

राज्यसभा निवडणूक नुकतीच पार पडली. यात महाविकास आघाडी आणि विशेषत: शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला. शिवसेनेचे एक मतही बाद करण्यात आले. यावर शिवसेनेच्या नेत्यांनी संताप व्यक्त केला. संजय राऊत यांनी तर ईडीच्या गैरवापरावरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.

Nilesh Rane : 'अशी भीक मागायची पद्धत...' संजय राऊतांच्या ईडीच्या वक्तव्यावरून निलेश राणेंचा संजय राऊतांवर वार
संजय राऊत/निलेश राणेImage Credit source: tv9
| Updated on: Jun 13, 2022 | 12:49 PM
Share

मुंबई : संजय राऊत (Sanjay Raut) दोन दिवसांसाठी ईडीचा ताबा मागत आहेत, जसे काही दोन हजार रुपये मागत आहेत, असा टोला भाजपा नेते निलेश राणे यांनी संजय राऊत यांना लगावला आहे. दोन दिवस ईडीचा ताबा द्या, देवेंद्र फडणवीससुद्धा शिवसेनेला मत देतील, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले होते. त्या पार्श्वभूमीवर निलेश राणे (Nilesh Rane) यांनी ही टीका केली आहे. ट्विट करत त्यांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे. ईडीच्या गैरवापरावरून राज्यात महाविकास आघाडी सरकार सातत्याने केंद्र सरकारवर टीका करत आहे. त्यात संजय राऊत यांनी राज्यसभेच्या पराभवानंतर आपला संताप ईडीवर (Enforcement Directorate) टीका करून केला होता. यावेळी निलेश राणे यांनी संजय राऊत यांनी भिक मागणे बरे नाही, असा टोलाही लगावला आहे.

‘200 रुपये मागत असल्यासारखे…’

राज्यसभा निवडणूक नुकतीच पार पडली. यात महाविकास आघाडी आणि विशेषत: शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला. शिवसेनेचे एक मतही बाद करण्यात आले. यावर शिवसेनेच्या नेत्यांनी संताप व्यक्त केला. संजय राऊत यांनी तर ईडीच्या गैरवापरावरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. रविवारी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले होते, की 48 तासांसाठी ईडी आमच्या हातात द्या. नंतर देवेंद्र फडणवीसदेखील शिवसेनेला मते देतील. संजय राऊत यांच्या या वक्तव्यावरून भाजपा नेते आता संतापले आहेत. आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. त्यात निलेश राणे यांनी शिवसेनेला आणि संजय राऊत यांना डिवचणारे ट्विट केले आहे. संजय राऊत यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर टीका करण्यात आली आहे. संजय राऊत ईडी मागत आहेत, 200 रुपये मागत असल्यासारखे… अशी भीक मागणे बरे नाही, असे निलेश राणे म्हणाले.

काय म्हटले आहे ट्विटमध्ये?

महाडिकांचा झाला विजय

राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे संजय पवार लढले. त्यांचा भाजपाचे धनंजय महाडिक यांनी पराभव केला. दोघेही कोल्हापूरचे. मात्र संजय पवार यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला. राज्यसभेच्या निवडणुकीत सहाव्या जागेवर भाजपाच्या धनंजय महाडिकांनी बाजी मारली. दोघामध्येही जोरदार लढत झाली. संजय पवार विजयी होतील, अशी सर्वांनाच अपेक्षा होती. मात्र घडले उलटे. संख्याबळ पुरेसे असूनही पवार यांचा पराभव झाला. तर अपक्षांची मते भाजपाने फोडल्याने त्याचा फायदा त्यांना झाला.

काय म्हणाले होते संजय राऊत?

मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.