“काँग्रेसच्या विजयानंतर आम्हाला ऊर्जा मिळाली”; ठाकरे गटाने महाविकास आघाडीची वज्रमूठ स्पष्ट करुन दाखवली

आमच्या महाविकास आघाडीमध्ये काय चालले आहे त्यापेक्षा महाराष्ट्रात अनेक मुद्दे आहेत त्याचा विचार त्यांनी करावे असा टोलाही त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला आहे.

काँग्रेसच्या विजयानंतर आम्हाला ऊर्जा मिळाली; ठाकरे गटाने महाविकास आघाडीची वज्रमूठ स्पष्ट करुन दाखवली
Follow us
| Updated on: May 14, 2023 | 7:58 PM

मुंबई : कर्नाटकमध्ये विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला विजय मिळाल्यानंतर आता राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातही आता चर्चा आणि बैठकांनाही जोर आला आहे. कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयानंतर आता महाविकास आघाडीतील नेत्यांच्या हलचालींना वेग आला असून आज सिल्वर ओकवर झालेल्या बैठकीत महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आल्या आहे. याविषयी बोलताना खासदार संजय राऊत यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, आज झालेल्या चर्चेदरम्यान तिन्ही पक्षातील नेत्यांमध्ये खुल्या दिलाने आणि मनाने चर्चा झाली आहे.

त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीतही तिन्ही पक्ष एकत्र लढून राज्यातील भाजपला हद्दपार केल्याशिवाय शांद बसणार नाहीत असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

खासदार संजय राऊत यांनी सिल्व्हर ओकवर झालेल्या बैठकीविषयी बोलताना सांगितले की, कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला विजय मिळाल्यामुळे आता महाविकास आघाडीला ऊर्जा मिळाली आहे. त्यामुळे आता जनतेला समजवण्यासाठी आम्ही जनतेत जाणार असल्याचेही खासदार संजय राऊत यांनी सांगितले.

तर सर्वाच्च न्यायालयाच्या निकालाविषयी बोलताना हा निकाल उद्धव ठाकरे यांच्याच बाजूने लागणार असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

त्यामुळे आता राज्यातील जनतेला आम्ही आता विश्वास देणार असून आगामी निवडणुकीसाठी महाविकास आघाडी एकत्रच लढणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

तसेच पुणे, कोल्हापूर येथील जागा वाटपावरही चर्चा केली जाणार असून येणाऱ्या काळात जागा वाटपावर चर्चा करुन तो विषय निकाली काढणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

तसेच गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचे चर्चा ऐकायला मिळत आहे. त्यावर बोलताना संजय राऊत यांनी स्पष्टपणे सांगितले की, तिन्हीही पक्षात मतभेद अजिबात नाहीत, त्यामुळे त्याची चिंता इतरांनी करायची काही गरज नाही असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

आमच्या महाविकास आघाडीमध्ये काय चालले आहे त्यापेक्षा महाराष्ट्रात अनेक मुद्दे आहेत त्याचा विचार त्यांनी करावे असा टोलाही त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला आहे. राज्यात असणारे हे सरकार हे 100 टक्के खोके सरकार असल्याचा घणाघातही त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला लगावला आहे.

Non Stop LIVE Update
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.