आता BMC रुग्णालयात गरिबांसाठी 139 रक्त चाचण्या मोफत

मुंबई : महानगर पालिकेच्या रुग्णालयात आता गोरगरिबांना मोफत रक्त चाचण्या करता येणार आहे. यामध्ये एकूण 139 रक्त चाचण्या मोफत करुन मिळणार आहेत. बीपीएल कार्ड धारकांसाठी या चाचण्या मोफत असतील. या प्रस्तावाला बुधवारी स्थायी समितीने मंजुरी दिली. तर इतर सर्व सामान्य रुग्णांकडून रक्तचाचणीसाठी फक्त 50 रुपये आकारले जाणार आहेत. मुंबईत महापालिकेची चार प्रमुख, 16 उपनगरीय आणि […]

आता BMC रुग्णालयात गरिबांसाठी 139 रक्त चाचण्या मोफत
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:39 PM

मुंबई : महानगर पालिकेच्या रुग्णालयात आता गोरगरिबांना मोफत रक्त चाचण्या करता येणार आहे. यामध्ये एकूण 139 रक्त चाचण्या मोफत करुन मिळणार आहेत. बीपीएल कार्ड धारकांसाठी या चाचण्या मोफत असतील. या प्रस्तावाला बुधवारी स्थायी समितीने मंजुरी दिली. तर इतर सर्व सामान्य रुग्णांकडून रक्तचाचणीसाठी फक्त 50 रुपये आकारले जाणार आहेत.

मुंबईत महापालिकेची चार प्रमुख, 16 उपनगरीय आणि पाच विशेष रुग्णालये आहेत. त्याशिवाय प्राथमिक आरोग्य सेवा अंतर्गत 175 दवाखाने आणि 28 प्रसतिगृहे आहेत. यामधील चार प्रमुख रुग्णालयांतील प्रयोगशाळेत चोवीस तास मुलभूत आणि प्रगत चाचण्या केल्या जातात. या प्रयोगशाळेतून आता मोफत चाचण्या करता येणार आहे.

या निर्णयाचा फायदा राज्यातील सर्व रुग्णांना होणार आहे. पालिकेच्या रुग्णालयात मुंबईसह देश भरातून रुग्ण उपचारासाठी येत असातात. येथे त्यांना रुग्णाच्या आजाराचे निदान करण्यासाठी अनेक रक्त चाचण्यांसाठी मोठा खर्च करावा लागतो. यासाठी केंद्र सरकारच्या ‘राष्ट्रीय आरोग्य मिशन’ योजनेंतर्गत ही सेवा गोरगरींबांसाठी मोफत सुरु करण्यात येत आहे.

कसा असेल खर्च?

या उप्रक्रमासाठी शहर आणि उपनगरांसाठी थायरोकेअर आणि मेट्रोपॉलिस या प्रयोगशाळांची नीवड करण्यात आली आहे. यामध्ये चार वर्षाच्या कंत्राटासाठी पूर्व उपनगरात मेट्रो पॉलिस हेल्थ केअर लिमिटेड काम करणार आहे. यासाठी 26.86 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. यामध्ये 8 उपनगरीय रुग्णालये, 47 दवाखाने आणि 10 प्रसुतिगृहांचा समावेश आहे. तर पश्चिम उपनगरात थायरोकेअर टेक्नॉलॉजी लिमिटेड काम करणार  असून चार वर्षासाठी 29.14 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. यामध्ये 8 उपनगरीय रुग्णालये, 58 दवाखाने आणि 13 प्रसुतिगृहांचा समावेश आहे.

मुंबई शहरात थायरोकेअर टेक्नॉलॉजी लिमिटेड काम करणार आहे. येथे चार वर्षासाठी 23.18 कोटी खर्च करण्यात येणार आहे. यामध्ये 5 विशेष रुग्णालये, 70 दवाखाने आणि 10 प्रसुतिगृहांचा समावेश आहे.

एकंदरीत, मुंबईतील सर्वसामान्य आणि गरीब नागरिकांना महापालिकेच्या या निर्णयाचा मोठा फायदा होताना दिसेल.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.