AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रत्येकवेळा पक्षाला जिंकून आणण्यासाठी लढतो, यावेळी आम्ही मुंबईकरांच्या विजयासाठी लढणार!

ओबीसींना वगळून महापालिका आरक्षणे निघाली पण आम्ही ओबीसी सोबत आहोत. सत्ताधाऱ्यांचा वॉर्ड रचनेपासूनच रडीचा डाव सुरू असून काँग्रेसचा तर रडारडीचा डाव आहे. या लढाईत भाजपाचे कार्यकर्ते डगमगणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रत्येकवेळा पक्षाला जिंकून आणण्यासाठी लढतो, यावेळी आम्ही मुंबईकरांच्या विजयासाठी लढणार!
प्रत्येकवेळा पक्षाला जिंकून आणण्यासाठी लढतो, यावेळी आम्ही मुंबईकरांच्या विजयासाठी लढणार! आशिष शेलार Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 02, 2022 | 12:19 AM
Share

मुंबई: ओबीसी आरक्षणाशिवाय (OBC reservation) मुंबई महापालिकेने वॉर्ड आरक्षणे जाहीर केले असली तरी ओबीसी आरक्षण मिळावेच असा रेटा भाजपाने ठेवल्याने आज पालिका आयुक्तांनी पुन्हा याबाबत बैठक घेतल्याची माहिती समोर आली आहे. हा ओबीसींचा न्यायाचा लढा असून आम्ही पाठपुरावा करीत असल्याचे मत भाजपा नेते आमदार अॅड. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी व्यक्त केले आहे. तसेच यावेळी त्यांनी सांगितले की, प्रत्येकवेळा पक्षाला जिंकून आणण्यासाठी लढतो, यावेळी आम्ही मुंबईकरांच्या विजयासाठी लढणार! भ्रष्टाचाराला हरवणार! है तयार हम, असे जाहीर केले आहे.

ओबीसी आरक्षणासह निवडणुका व्हाव्यात

ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका व्हाव्यात अशी आग्रही भूमिका भाजपाने घेतली असून याबाबत रस्त्यावर उतरून आंदोलनही करण्यात आले. मात्र ठाकरे सरकार न्यायालयात अपयशी ठरल्यानंतर काल ओबीसी आरक्षण वगळून सोडती जाहीर करण्यात आल्या. त्यानंतर ही भाजपाने आरक्षण मिळालेच पाहिजे असा आग्रह धरला आहे.

पक्षातंर्गत ओबीसींंना न्याय देऊ

पक्षाचे प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांनी कालच याबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट केली. आम्ही पक्षातंर्गत ओबीसींंना न्याय देऊ असेही पक्षाने जाहीर केले त्यामुळे सत्ताधारी पक्षावरील दबाव कायम ठेवण्यात भाजपाला यश आले आहे.

ओबीसींना वगळून महापालिका आरक्षणे निघाली

आज याबाबत प्रतिक्रिया देताना आमदार अॅड. आशिष शेलार म्हणाले की, ओबीसींना वगळून महापालिका आरक्षणे निघाली पण आम्ही ओबीसी सोबत आहोत. सत्ताधाऱ्यांचा वॉर्ड रचनेपासूनच रडीचा डाव सुरू असून काँग्रेसचा तर रडारडीचा डाव आहे. या लढाईत भाजपाचे कार्यकर्ते डगमगणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

आम्ही मुंबईकरांच्या विजयासाठी लढणार

प्रत्येकवेळा पक्षाला जिंकून आणण्यासाठी लढतो, यावेळी आम्ही मुंबईकरांच्या विजयासाठी लढणार! भ्रष्टाचाराला हरवणार! है तयार हम, असे जाहीर केले. भाजपाचा हा ओबीसींंच्या बाजूने वाढता दबाव कामी आला आहे. आज मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी ओबीसी आरक्षणासह पुन्हा सोडत काढायची झाल्यास प्रशासनाने करायच्या उपाययोजनांंबाबत बैठक घेतल्याची खात्रीलायक माहिती आहे. आम्ही या प्रस्तावीत बदलाचे स्वागत करु तसेच त्यासाठी पाठपुरावा सुरुच ठेवू, अशी प्रतिक्रिया भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी दिली.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.