AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सार्वजनिक मैदानांचे व्यापारीकरण? पंचतारांकित हॉटेल्सची आऊटलेट उभारण्यास परवानगी, नगरविकास खात्याचा अजब फतवा

Commercialization of public spaces: अगोदरच मोठ्या शहरात खेळाची मैदानं कमीच नाही तर ओस पडत आहेत. त्यात आता नगरविकास खात्याच्या नवीन फतव्याने नागरिकच नाही तर अनेक क्रीडा आणि राजकीय संगघटनांना विरोधाचे आयते कोलीत मिळाले आहे. काय आहे तो निर्णय?

सार्वजनिक मैदानांचे व्यापारीकरण? पंचतारांकित हॉटेल्सची आऊटलेट उभारण्यास परवानगी, नगरविकास खात्याचा अजब फतवा
मैदानांचं व्यापारीकरण?Image Credit source: एजन्सी
| Updated on: Apr 12, 2026 | 9:32 AM
Share

Commercialization of public spaces: राज्यातील मोठ्या आणि मेट्रो शहरात मैदानं कमी पडत आहेत. काही ठिकाणी मैदानं आहेत, पण त्यांची निगा आणि देखभाल होत नाही. ती बकाल झाली आहेत. तर काही ठिकाणी मैदानं आहेत, पण खेळाडू नाहीत असा सगळा गोंधळ सुरू आहे. अर्थात असे असेल तरी अनेक मैदानांवर नागरिकांची मोठी गर्दी असतेच. आता या मैदाना प्रेमींचा हिरमोड करणारी बातमी समोर आली आहे. राज्यातील मोठ्या सार्वजनिक मैदानांवर पंचतारांकित हॉटेल्स त्यांचे आऊटलेट उघडू शकतात. त्यासाठीची परवानगी नगरविकास खात्याने दिली आहे.

अनेक गोंडस टॅग लावून निर्णय माथी मारला?

शहरातील मोठ्या मैदानांवर पंचतारांकित हॉटेल्स पाय पसरू शकतील. शहरी विकासाला चालना देण्यासाठी, पर्यटन वाढावे आणि स्थानिक पातळीवर रोजगार मिळावा यासाठी हा निर्णय लोकांच्या माथी मारण्यात आला आहे. नगरविकास खात्याच्या या निर्णयाने अनेक संगटना आक्रमक होण्याची शक्यता आहे. तर हक्काची मैदानं पंचतारांकित हॉटेल्सला देण्यामागे काय धोरण आहे हे मात्र गुलदस्त्यात आहे. या नवीन धोरणानुसार, विशिष्ट अटी, शर्ती, नियमांचे या हॉटेल्सला पालन करावे लागणार आहे. मोठ्या मैदानांवरील एक विशिष्ट भागच या हॉटेल्सला देण्यात येणार आहे. पण एकदा बिऱ्हाडं थाटल्यावर ही हॉटेल्स मनमानी करणार नाहीत, याची काही शाश्वती आहे का, असा सवाल नागरीक विचारत आहेत.

मैदानासह, खेळाडू नागरिकांचं मरण

पंचतारांकीत हॉटेल्स या मैदानाच्या एका भागावर कन्व्हेक्शन सेंटर आणि पर्यटन वाढीसंदर्भातील सुविधा उभारू शकतील. अर्थात त्यासाठी मैदानाचा एखादा भाग त्यांना वापरता येणार आहे. मैदानाचा मूळ वापर आणि पर्यायवरणाचा विचार त्यासाठी करावा लागणार आहे. अटी आणि शर्तीं भंग होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे. या निर्णयावर सार्वजनिक संस्था, सामाजिक संस्था, राजकीय संघटना, क्रीडा संघटना आणि नागरिकांनी मोठी चिंता व्यक्त केली आहे. या उपक्रमामुळे वापराजोगी जागा कमी होण्याची भीती आहे.  आता सरकार याविषयीची कितपत दखल घेते हे लवकरच समोर येईल.

Follow Us
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा
शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या....
Sunil Tatkare : शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या निर्णयावर काय म्हणाले?
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं काय घडतंय?
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद,
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त