मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवर पेट्रोलच्या बाटल्या फेकल्या, धक्कादायक प्रकारानं सुरक्षा यंत्रणा अलर्टवर

| Updated on: Aug 13, 2021 | 9:21 AM

मुंबई विमानतळाच्या धावपट्टीच्या दिशेने अज्ञातांकडून पेट्रोलच्या बाटल्या फेकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यानंतर सुरक्षा यंत्रणा सावध झाली आहे. सीआयएसएफला घटनास्थळावरुन बॉटल सापडल्या आहेत.

मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवर पेट्रोलच्या बाटल्या फेकल्या, धक्कादायक प्रकारानं सुरक्षा यंत्रणा अलर्टवर
Follow us on

मुंबई : मुंबई विमानतळाच्या धावपट्टीच्या दिशेने अज्ञातांकडून पेट्रोलच्या बाटल्या फेकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यानंतर सुरक्षा यंत्रणा सावध झाली आहे. सीआयएसएफला घटनास्थळावरुन बॉटल सापडल्या आहेत. बुधवारी (11 ऑगस्ट) रात्री 9 च्या सुमारास ही घटना घडली. त्यानंतर बॉम्बशोधक व नाशक पथकांच्या टीमने या परिसराची तपासणी केली. संपूर्ण परिसराची झडती घेत बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर थेट पेट्रोलच्या बाटल्या आढळल्यानं सुरक्षा यंत्रणेची जबाबदारी असलेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल सतर्क झालंय. या बाटल्या विमानतळाच्या गावदेवी झोपडपट्टीच्या शेजारील संरक्षक भिंतीवरुन धावपट्टीवर फेकल्याचं स्पष्ट झालंय. यानंतर सीआयएसएफने तातडीने बॉम्बशोधक व नाशक पथकाला बोलावलं.

“गावदेवी परिसराची झाडाझडती, आरोपींचा थांगपत्ता नाही”

या पथकाला परिसरात काही पेट्रोलच्या बाटल्या सापडल्या. त्यांनी या बाटल्या निष्क्रिय केल्या. यानंतर सीआयएसएफने स्थानिक पोलिसांना माहिती देत घटनास्थळावर बोलावलं. पोलिसांनी हा परिसर पिंजून काढत शोधमोहिम राबवली. मात्र, आरोपींचा अद्याप शोध लागलेला नाही. विशेष म्हणजे या घटनेनंतर विमानतळाच्या नियमित उड्डाणांवर कोणताही परिणाम झालेला नाही, अशीही माहिती मिळतेय.

हेही वाचा :

देशातले सर्व विमानतळं अदानी समूहाकडे? केंद्र सरकारनं काय दिलं उत्तर? वाचा

मुंबई विमानतळाचा मालकी हक्क कोणाकडे नाही, असं होत असेल तर शिवसेना सहन करणार नाही

Video: मुंबईत शिवसैनिकांचा तुफान राडा, ‘अदानी एअरपोर्ट’वर संतप्त, जोरदार तोडफोड

व्हिडीओ पाहा :

Petrol bottles throw on Mumbai Airport runway Security on alert