मुंबईच्या बारमध्ये स्टार्टरसाठी होतोय कबुतरांचा वापर? सेवानिवृत्त लष्कर अधिकाऱ्याने दिली तक्रार 

| Updated on: Nov 27, 2022 | 2:37 PM

मुंबईतील रेस्टोरेंट आणि बारमध्ये स्टार्टर म्हणून कबुतरांचा वापर केला जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

मुंबईच्या बारमध्ये स्टार्टरसाठी होतोय कबुतरांचा वापर? सेवानिवृत्त लष्कर अधिकाऱ्याने दिली तक्रार 
स्टार्टरमध्ये कबुतरांचा वापर?
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई, मुंबईच्या काही बार आणि स्टार्टरसाठी (used for starters) कबुतरांचा (Pigeons) वापर होत असल्याचा गंभीर आरोप निवृत्त लष्करी अधिकाऱ्याने केला आहे. कॅप्टन हरिश गगलानी असे सेवानिवृत्त लष्कर अधिकाऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणाची दाखल घेत तक्रार दाखल करून घेतली आहे. या अनुषंगाने पोलिसांनी तपास देखील सुरू केला आहे. कबुतर हे संरक्षित पक्ष्यांचा कक्षेत मोडतात. त्यांचा वापर रेस्टोरंट आणि बारमध्ये खाद्यपदार्थ म्हणून केला जात असेल तर ही अतिशय गंभीर बाब आहे.

हरीश गगलानी यांनी दिलेली तक्रार काय आहे?

निवृत्त लष्करी अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून मुंबईच्या सायन (शिव) पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. दरम्यान, निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांनी केलेले दावे खरे की खोटे याचा तपास पोलीस करत आहेत. तक्रारदार निवृत्त लष्करी अधिकारी कॅप्टन हरीश गगलानी यांनी सांगितले की, ते राहत असलेल्या इमारतीच्या छतावर कबुतरांचा आवाज ऐकू येत होते. एकदा मला संशय आला, मी ते नक्की काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र छताला कुलूप होते. त्यानंतर मी पाहिले की तेथे अनेक कबुतरांना पिंजऱ्यात कैद केले आहे आणि कायद्याने असे करणे चुकीचे आहे. मी पोलिसांत तक्रार दाखल केली. मात्र पोलिसांनी याकडे लक्ष दिले नाही. त्यानंतर मी महाराष्ट्र राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवला असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या पाळीव कबुतरांची हॉटेल आणि बारमध्ये विक्री होत असल्याची माहितीही तक्रारदारांनी दिली.

हे सुद्धा वाचा

तक्रारीनंतर पोलिसांचा तपास सुरु

सेवानिवृत्त लष्कर अधिकारी हरीश गगलानी यांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. संबंधित रेस्टोरंटमध्ये स्टार्टर म्हणून कबुतराच्या वापर होतोय का याची तपासणी पोलिसांकडून करण्यात येत आहे. तक्रारीत नमूद करण्यात आलेले आरोप सिद्ध झाल्यास या रेस्टोरंट आणि बार चालकांवर मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे.