Plasma Therapy : कोरोनामुक्त झालेल्या तब्लिगीकडून प्लाझ्मा डोनेट, मुंबईकर तब्लिगीला पहिला मान

| Updated on: Apr 27, 2020 | 3:56 PM

तब्लिग जमातचा एक व्यक्ती कोरोनाविरुद्धच्या लढाईत वापरण्यात येणाऱ्या प्लाझ्मा थेरपीचा पहिला डोनर ठरला आहे. तब्लिगचे कार्यकर्ते अब्दुर रेहमान हे पहिले प्लाझ्मा डोनेट करणारे डोनर (Plasma Therapy First Donor) ठरले आहेत.

Plasma Therapy : कोरोनामुक्त झालेल्या तब्लिगीकडून प्लाझ्मा डोनेट, मुंबईकर तब्लिगीला पहिला मान
Follow us on

मुंबई : दिल्लीतील निजामुद्दीन येथे झालेल्या मरकसनंतर (Plasma Therapy First Donor) तब्लिग जमातमुळे देशात मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूचा पसरल्याचा आरोप झाला. मात्र, आता त्याच तब्लिग जमातचा एक व्यक्ती कोरोनाविरुद्धच्या लढाईत वापरण्यात येणाऱ्या ‘प्लाझ्मा थेरपी’चा पहिला डोनर ठरला आहे. तब्लिगचे कार्यकर्ते अब्दुर रेहमान हे पहिले प्लाझ्मा डोनेट करणारे डोनर (Plasma Therapy First Donor) ठरले आहेत.

अब्दूर रेहमान हे दक्षिण मुंबईतील कामाठीपुरा परिसरात राहतात. दिल्ली येथे झालेल्या मरकसच्या कार्यक्रमाला तेही गेले होते. मुंबईत आल्यानंतर त्यांच्यात कोरोनाची लक्षणं आढळल्याने त्यांना 21 मार्चला कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर ते कोरोनातून उपचाराने बरे झाले. त्यामुळे 31 मार्चला त्यांना डिस्चार्ज करण्यात आले.

मुंबईत कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. कोरोना हा प्लाझ्मा थेरेपीने बरा होऊ शकतो, हे सिद्ध झाल्याने आता कोरोना रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीचा उपचार सुरु करण्यात आला आहे. प्लाझ्मा थेरेपीसाठी कोरोना आजारातून बरे झालेल्या रुग्णांच्या रक्तातील प्लाझ्मा वापरला जातो. कारण, जे रुग्ण कोरोनातून बरे झालेत त्यांच्यातील रोगप्रतिकार शक्ती वाढलेली असते आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचं काम प्लाझ्मा करते.

त्यामुळे आता कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांच्या रक्तातील प्लाझ्मा गोळा करण्याचं काम सध्या सुरु आहे. कोरोनामुक्त झालेले अब्दुर रेहमान यांना प्राधान्याने प्लाझ्मा डोनेट करण्यासाठी विचारण्यात आलं (Plasma Therapy First Donor), तेव्हा त्यांनी आनंदाने प्लाझ्मा डोनेट केला.

काही लोक केवळ हिंदू मुस्लिमचा मुद्दा करत आहेत. आम्ही धर्मासाठी नाही, तर माणुसकीसाठी काम करत आहोत. आम्हाला निजामुद्दीन येथील आमच्या गुरुंनी जास्तीत जास्त प्लाझ्मा डोनेट करा, असा आदेश दिला आहे. त्यामुळे आमच्यातील कोरोनामुक्त झालेले सदस्य प्लाझ्मा डोनेट करतीलच, शिवाय इतर सदस्यही प्लाझ्मा डोनेट करायला तयार असल्याचं अब्दुल रेहमान यांचं म्हणणं आहे.

प्लाझ्मा थेरेपी म्हणजे काय?

प्लाझ्मा हा एक पिवळसर रंगाचा द्रव्य घटक आहे. हा आपल्या रक्तातील पेशींना संपू्र्ण शरीरात प्रवाहित करण्याचं काम करतो. तो रक्ताच्या 55 टक्के असतो. प्लाझ्मा हा रुग्णांना योग्य प्रमाणात दिल्याने शरीरात अँटीबॉडी तयार होतात. ही अँटीबॉडीज फक्त संसर्ग झालेल्या लोकांपासूनच तयार केल्या जाऊ शकतात.

कोविड-19 पासून बरे झालेल्या रुग्णांमध्ये या अँटीबॉडीज आढळून आल्या आहेत, ज्या या विषाणूला नष्ट करण्यासाठी आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आवश्यक असतात. याला कॉन्व्हुलसंट प्लाझ्मा थेरपी (Convulsant Plasma Therapy) असं म्हणतात. या थेरेपीचा वापर पहिल्यांदा 1918 मध्ये स्पॅनिश फ्लू महामारीवेळी करण्यात आला होता.

Plasma Therapy First Donor

संबंधित बातम्या :

कोरोनाचं संकट कायम, लॉकडाऊन कडक करण्याचा निर्णय सर्वस्वी राज्यांचा : पंतप्रधान मोदी

मुंबईच्या महापौर झाल्या कोविड योद्धा, किशोरी पेडणेकर पुन्हा नर्सच्या भूमिकेत

लॉकडाऊनमध्ये पत्ते खेळणाऱ्यांचाच गेम, पत्ते पिसून वाटल्याने 40 जणांना कोरोना

घरी जाण्यासाठी आयडिया, पठ्ठ्याने तब्बल 25 टन कांदा खरेदी केला, मुंबई-उ.प्रदेश ‘अत्यावश्यक’ प्रवास