लॉकडाऊनमध्ये पत्ते खेळणाऱ्यांचाच गेम, पत्ते पिसून वाटल्याने 40 जणांना कोरोना

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला (corona infected due to playing card) आहे.

लॉकडाऊनमध्ये पत्ते खेळणाऱ्यांचाच गेम, पत्ते पिसून वाटल्याने 40 जणांना कोरोना

हैद्राबाद : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला (corona infected due to playing card) आहे. सरकारकडून नागरिकांना अनेकदा सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पण लोकं या सूचनांचे पालन करत नसल्याचे समोर आलं आहे. आंध्र प्रदेशमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता पत्ते खेळत असलेल्या एकूण 40 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ (corona infected due to playing card) उडाली आहे.

आंध्र प्रदेशच्या कृष्णा जिल्ह्यातील विजयवाडा विभागात लॉकडाऊनमध्ये वेळ घालवण्यासाठी काही लोक मिळून पत्ते खेळत होते. यामुळे 40 लोकांना कोरोनाची लागण झाली. ही माहिती कृष्णा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी ए मोहम्मद इम्तियाज यांनी दिली.

“कृष्णा जिल्ह्यातील दोन ठिकाणी या घटना घडल्या आहेत. जिल्ह्यातील लंका येथे वेळ घालवण्यासाठी ट्रक चालक आणि शेजारचे मिळून पत्ते खेळत होते. तर महिला मिळून हौजी खेळत होत्या. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे नियम मोडून लोकं खेळत असल्यामुळे एकूण 24 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर अशीच घटना कर्मिक नगरमध्येही घडली आहे. येथेही ट्रक चालकांनी सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन करत पत्ते खेळल्याने येथील 16 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे”, असं जिल्हाधिकारी ए मोहम्मद इम्तियाज यांनी सांगितले.

दोन्ही घटना समोर आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून नागरिकांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा, असा संदेश दिला आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन न केल्यामुळे ही लागण झाल्याचे समोर आलं आहे. त्यामुळे सर्वांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा, असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वांना केले आहे. विजयवाडामध्ये आतापर्यंत 100 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.

देशात कोरोना रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या 24 तासात देशात 1990 कोरोना रुग्ण आढळले आहेत. या विषाणूमुळे 49 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने दिली. देशात कोरोना रुग्णांची संख्या 26 हजार 496 वर पोहोचली आहे. तर या विषाणूमुळे आतापर्यंत 824 लोकांचा मृत्यू झाला आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *