Bacchu Kadu: 150 वेळा रक्तदान, 350 हून अधिक केसेस तरीही विधानसभेत पराभव…बच्चू कडू यांचे ते शल्य समोर
Bacchu Kadu expressed displeasure: प्रहारचे सर्वेसर्वा बच्चू कडू हे शिंदे सेनेकडून विधान परिषदेवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या सर्व प्रकारावर बच्चू कडू यांनी पत्रकार परिषद घेत बाजू मांडली. त्याचवेळी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव त्यांच्या जिव्हारी लागल्याचे दिसले.

Bacchu Kadu expressed displeasure: प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. त्यांनी शिंदे सेनेकडून विधान परिषदेवर जाण्याची आणि प्रहार संघटना शिवसेनेत विलिनीकरण करण्याच्या चर्चा निरर्थक असल्याचे म्हटले आहे. अजून याविषयी कोणतीही चर्चा झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. चर्चा नाही तर त्यावर बोलण्यास त्यांनी नकार दिला. तर मंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा केल्याचे सांगितले. या पत्रकार परिषदेत बच्चू कडू यांच्या मनाला लागलेली बोचणीही समोर आली.
बच्चू कडू यांना पराभवाची सल
सामना करावा लागले. अचलपूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे प्रवीण तायडे विजयी झाले. बच्चू कडू यांच्या पक्षाने 40 मतदारसंघात उमेदवार दिला होता. तर अचलपूर मतदारसंघात काँग्रेसचे अनिरुद्ध देशमुख हे तिरंगी लढतीत सहभागी होते. या निवडणुकीत बच्चू कडू यांचा पराभव झाला होता.
त्याची बोचणी आजही बच्चू कडू यांना असल्याचे दिसून आले. आज त्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. त्यांनी विधान परिषदेवर जाण्याबाबत आणि प्रहार शिवसेनेत विलीन करण्याबाबत भूमिका मांडली. त्याचवेळी अचलपूर मतदारसंघातील पराभवाची बोचणी त्यांना असल्याचे दिसून आले. आपण 150 वेळा रक्तदान केले. जनतेच्या, शेतकर्यांच्या प्रश्नावर 350 केसेस अंगावर घेतल्या. पडल्यानंतर पुन्हा 80 गुन्हे दाखल झाले. तरीही बच्चू कडूला विधानसभेत पराभव पत्कारावा लागला याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्यांनी मनातील सल यावेळी बोलून दाखवली. देशातील राजकारण हे जात पात धर्माच्या ताकदीवर चालतं. मुद्दा आणि काम करणाऱ्या कार्यकर्त्याला मागं राहावं लागतं. हे सर्वांना माहिती आहे. ते वेगळं सांगायची गरज नाही. जनता मेंढरासारखे जाती धर्माच्या मागे जातात. काम करणाऱ्या कार्यकर्त्याला थांबावं लागतं, अशा शब्दात त्यांनी पराभवावर मत व्यक्त केलं. भावना व्यक्त केल्या.
बातमीतून बातमी तयार झाली
तर विधान परिषदेवर आमदारकीसाठी जाणार आणि प्रहार जनशक्ती पक्ष हा शिवसेनेत विलीन करणार यावर त्यांनी या भाष्य केले. बातमीतून बातमी तयार झाल्याचा दावा त्यांनी केला. पद आणि आमदारकीसाठी बच्चू कडू असा कोणताही निर्णय घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जनतेचा भिडू, बच्चू कडू असे ते म्हणाले. तर दिव्यांग मंत्रालय, शेतकरी आणि शेत मजूरासाठी कर्जमाफी प्रहारच्या आंदोलनामुळे केल्याचे ते म्हणाले.