Prasad lad : ठाणे, मुंबई पालिका निवडणुका जिंकण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून लॉलीपॉप-प्रसाद लाड

| Updated on: Jan 01, 2022 | 6:09 PM

2015 च्या निवडणुकीत हा अजेंडा होता, आत्ता ते राजकीय स्टंट करत आहेत, लोकांना लॉलीपॉप देत आहेत, अशी टीका मुख्यमंत्र्यांच्या घोषणेवर भाजप नेते प्रसाद लाड यांनी केली आहे.

Prasad lad : ठाणे, मुंबई पालिका निवडणुका जिंकण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून लॉलीपॉप-प्रसाद लाड
प्रसाद लाड, आमदार, भाजप
Follow us on

मुंबई : नवीन वर्षाच्या सुरूवातीलचा मुख्यमंत्र्यांनी शस्त्रक्रियेनंतर पहिल्यांदाच जनतेला संबोधताना मुंबईकरांसाठी मोठा निर्णय जाहीर केला आहे. मुख्यमंत्र्यांनी मुंबईत 500 चौ. फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ केल्याची घोषणा केली आहे, मात्र मुख्यमंत्र्यांची ही घोषणा केवळ देखावा असून, मुंबई आणि ठाणे महापालिकेची निवडणूक जिंकण्यासाठी हा निर्णय घेतल्याची टीका भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहे. भाजप नेते प्रसाद लाड यांनीही यावर भाष्य केलंय.

प्रसाद लाड काय म्हणाले?

2015 च्या निवडणुकीत हा अजेंडा होता, आत्ता ते राजकीय स्टंट करत आहेत, लोकांना लॉलीपॉप देत आहेत, अशी टीका मुख्यमंत्र्यांच्या घोषणेवर भाजप नेते प्रसाद लाड यांनी केली आहे. तसेच फडणवीसांनी जे काम केलं सगळ्यांनी पाहिलं, मुख्यमंत्री काय म्हणतात त्याला महत्व नाही, खंडणीसाठी मुंबईकरांचा विकास कसा थांबला जनता पाहतेय, देवेंद्र फडणवीसांची तुलना कुणी करू नये, असा घणाघात त्यांनी केला आहे.

जे पेरणार ते ऊगवणार

नारायण राणेंच्या हाहात वाघाची शेपटी असलेला एक पोस्टर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, त्याबाबत बोलताना प्रसाद लाड म्हणाले, जे पेरणार ते ऊगवणार, नियमांनी कामकाज करावं, नितेश राणेंचे पोस्टर लावले त्याच्या ऊलट हे रिअॅक्शन असू शकतं, हे मी केलेलं नाही, असे त्यांनी सांगितले. तसेच नवाब मलिक फर्जिवाडा आहे, त्यांच्याबद्दल बलायचं नाही असं ठरवलंय, मी काय सांगू क्रिकेट आणि लंगडी गेम काय असतो, ज्यांनी सत्तेत येण्याची चिटिंग केली त्यांनी आम्हाला शिकवू नये, असा टोला लाड यांनी मलिक यांना लगावलाय. प्रसाद लाड यांनी शिवसेना खासदार संजय राऊतांवर टीका करताना, संजय राऊत स्वत:ला पंतप्रधान समजतात का? संजय राऊतांनी पंतप्रधान किती चांगलं बोलतात, वागतात त्याचं अवलोकन करायला पाहिजे, अशी कोपरखिळी मारली आहे.

Pimpri chinchawd crime | पिंपरीत पाण्याच्या टँकर खाली चिरडल्याने दोन वर्षीय बालकाचा दुदैवी मृत्यू

Drug : मुंबईत तीन कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त, अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई, तीन आफ्रिकन नागरिक अटक

IND vs SA: काल जंगी सेलिब्रेशन, आज वाँडरर्सवर टीम इंडियाने गाळला घाम