AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA: काल जंगी सेलिब्रेशन, आज वाँडरर्सवर टीम इंडियाने गाळला घाम

जोहान्सबर्ग: काल न्यू इयरच जंगी सेलिब्रेशन केल्यानंतर टीम इंडियाने आज जोहान्बर्गच्या वाँडरर्स स्टेडियममवर घाम गाळला. सोमवारपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी खेळाडूंनी जोरदार तयारी केली. सध्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारत 1-0 ने आघाडीवर आहे. सेंच्युरियनवर भारताने ऐतिहासिक कसोटी विजयाची नोंद केली. सेंच्युरियनवर कसोटी जिंकणारा भारत पहिला आशियाई संघ ठरला. 29 वर्षानंतर दक्षिण […]

IND vs SA: काल जंगी सेलिब्रेशन, आज वाँडरर्सवर टीम इंडियाने गाळला घाम
(Courtesy: bcci.tv screenshot)
| Edited By: | Updated on: Jan 01, 2022 | 5:40 PM
Share

जोहान्सबर्ग: काल न्यू इयरच जंगी सेलिब्रेशन केल्यानंतर टीम इंडियाने आज जोहान्बर्गच्या वाँडरर्स स्टेडियममवर घाम गाळला. सोमवारपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी खेळाडूंनी जोरदार तयारी केली. सध्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारत 1-0 ने आघाडीवर आहे. सेंच्युरियनवर भारताने ऐतिहासिक कसोटी विजयाची नोंद केली. सेंच्युरियनवर कसोटी जिंकणारा भारत पहिला आशियाई संघ ठरला. 29 वर्षानंतर दक्षिण आफ्रिकेत मालिका विजयाच्या इराद्याने टीम इंडिया खेळत आहे. (Ind vs SA India reach Johannesburg sweat it out at the Wanderers ahead of 2nd Test)

ऐतिहासिक मालिका विजयापासून एक पाऊल दूर 

बीसीसीआयने शनिवारी टीम इंडियाच्या वाँडरर्स स्टेडियमवरील ट्रेनिंगचा व्हिडिओ पोस्ट केला. पहिली कसोटी 113 धावांनी जिंकून टीम इंडियाने मालिकेत दक्षिण आफ्रिकेला बॅकफूटवर ढकललं आहे. भारत ऐतिहासिक कसोटी मालिका विजयापासून आता फक्त एक पाऊल दूर आहे.

विजयानंतर कर्णधार विराट कोहलीने भारताच्या वेगवान गोलंदाजांचे कौतुक केले होते. मोहम्मद शामी जगातील तीन सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांपैकी एक असल्याचे विराटने म्हटले होते. सेंच्युरियन कसोटीत शामीने आठ विकेट घेतल्या. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजने दोन्ही डावात मिळून अनुक्रमे पाच आणि तीन विकेट घेतल्या. ‘वर्ल्ड क्लास’ अशा शब्दात सामन्यानंतर प्रेझेंटेशन सोहळ्याच्यावेळी विराटने शामीचे कौतुक केले होते.

वाँडरर्सवर भारत-दक्षिण आफ्रिका शेवटच्या सामन्याचा निकाल काय लागला होता 

भारताने वाँडरर्स स्टेडियममवर खेळलेला शेवटचा कसोटी सामना 63 धावांनी जिंकला होता. विराट कोहलीने पहिल्या डावात अर्धशतक झळकावले होते तर दुसऱ्या डावात अजिंक्य रहाणेने चांगली खेळी केली होती. दुसऱ्या डावात शामीने बॉलने कमाल दाखवली होती. त्याने पाच विकेट घेतल्या होत्या. भारताच्या 241 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ 177 धावात ऑलआऊट झाला होता.

संबंधित बातम्या:

IND vs SA: रोहित शर्मानंतर पुढचा कॅप्टन कोण? निवड समितीचे प्रमुख चेतन शर्मांनी दिलं उत्तर टीम इंडियाचं दक्षिण आफ्रिकेत 31st चं जंगी सेलिब्रेशन पाहा खास PHOTOS Ravi Shastri| ‘चालू दे तुमचं’, रवी शास्त्रींनी सांगितला पंत-गिल बरोबरचा शौचालयातला ‘तो’ किस्सा

(Ind vs SA India reach Johannesburg sweat it out at the Wanderers ahead of 2nd Test)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.