प्रभू रामचंद्र भारतासाठी काय आहेत?; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काय केलं विराट वर्णन

राम मंदिर सोहळ्याचा उत्सव मोठया थाटामाटात पार पडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्रीरामांचा प्राण प्रतिष्ठा सोहळा झाल्यावर मोदी यांनी आपल्या भाषणामध्ये प्रभू श्रीरामचंद्र भारतासाठी काय आहेत याचं विराट वर्णन केलं आहे.

प्रभू रामचंद्र भारतासाठी काय आहेत?; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काय केलं विराट वर्णन
PM Narendra Modi Ram Mandir SpeechPM Narendra Modi Ram Mandir Speech
Harish Malusare | Updated on: Jan 22, 2024 | 3:04 PM

मुंबई : राम मंदिराचं उद्घाटन झालं असून प्रभू श्रीराम आज विराजमान झाले आहेत. देशातील रामभक्तांसाठी आनंदाचा क्षण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांच्यासह संत समाजाच्या उपस्थितीत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा ऐतिहासिक विधी पार पडला. यावेळी गर्भगृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या उपस्थितीत हा विधी पूर्ण करण्यात आला. यावेळी मोदी यांनी आपल्याभाषणामध्ये प्रभू रामचंद्र यांचं विराट वर्णन केलंय.

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी -:

आजचा क्षण भारतीय समाजाच्या परिपक्वतेचा बोध आहे. आजचा क्षण विजयाचा नाही तर विनयाचाही आहे. अनेक राष्ट्र इतिहासात गुरफुटून जातात. त्यांनी इतिहास उलगडताना अनेक संकटांना सामोरे जावे लागले. त्यातून अडचणी आल्या. पण आपण इतिहासाची ही गाठ अत्यंत भावूकतेने सोडली आहे. आपलं भविष्य आपल्या भूतकाळापेक्षा अधिक सुंदर होणार आहे. राम मंदिर बनलं तर आग लागेल असं काही लोक म्हणत होते. पण या लोकांना भारताच्या सामाजिक भावाची पवित्रता माहीतच नव्हती, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

राम वाद नाही, समाधान- नरेंद्र मोदी

रामलल्लाच्या मंदिराची निर्मिती सदभाव, समन्वयाचं प्रतीक आहे. भारतीय समाजाची एकरुपता आहे. हे नवनिर्माण आगीला नव्हे तर ऊर्जेला जन्म देत आहे, हे आपण पाहत आहोत. भारतीय समाजाला उज्ज्वल भवितव्याकडे नेण्याचा प्रयत्न करणार आहे. त्या लोकांना मी आाहन करतो, या पुनर्विचार करा. राम आग नाही, राम ऊर्जा आहे. राम वाद नाही, समाधान आहे. राम फक्त आपले नाहीत, ते सर्वांचे आहे. राम फक्त वर्तमान नाही, राम अनंत काल आहे.

राम भारताची आस्था, प्रतिष्ठा- मोदी

मंदिर फक्त देवाचं मंदिर नाही. तर भारताच्या दृष्टीचे भारताच्या दर्शनाचे मंदिर आहे. हे रामाच्या रुपातील राष्ट्र चेतनेचं मंदिर आहे. राम भारताची आस्था आहे. राम भारत आधार आहे. राम भारताचा विचार आहे, राम भारताची चेतना आहे, चिंतन आहे. प्रतिष्ठा आहे, प्रताप आहे. प्रवाह आहे, प्रभावही आहे. राम नेती आहे, निती आहे. राम नित्यता आहे. राम निरंतर आहे. राम व्यापक आहे. राम विश्व आहे. राम विश्वात्मा आहे. जेव्हा रामाची प्रतिष्ठा होते तेव्हा त्याचा प्रभाव वर्षभरासाठी नसतो तर हजारो वर्षासाठीचा असल्याचं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us