पूजा खेडकरची आई मनोरम खेडकर यांना जामीन मंजुर, येरवडा जेलमधून सुटका

वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरची आई मनोरमा दिलीप खेडकरची आज येरवडा जेलमधून सुटका झाली आहे. शुक्रवारी पुणे न्यायालयाने मनोरमा खेडकर यांचा जामीन मंजूर केला होता.

पूजा खेडकरची आई मनोरम खेडकर यांना जामीन मंजुर, येरवडा जेलमधून सुटका
Manorama Khedkar Puja Khedkar
| Updated on: Aug 03, 2024 | 10:33 PM

पूजा खेडकर हिचे प्रकरण फक्त राज्यातच नाही तर देशभर गाजत आहे. प्रशिक्षणार्थी आयएएस रद्द झालेली उमेदवार पूजा खेडकर हिच्या समस्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी दिल्लीतील न्यायालयाने पूजा खेडकर हिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. पूजा खेडकर दुबईला गेल्याची चर्चा सध्या होत आहे. अशातच पूजा खेडकरच्या आईला मनोरमा दिलीप खेडकर यांना जामीन मंजुर झाला आहे.

वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरची आई मनोरमा दिलीप खेडकरची आज येरवडा जेलमधून सुटका झाली आहे. शुक्रवारी पुणे न्यायालयाने मनोरमा खेडकर यांचा जामीन मंजूर केला होता. मुळशी मधील शेतकऱ्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून धमवकावल्या आणि जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी त्यांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. 14 दिवसांच्या आधीच त्यांना जामीन मंजूर झाला आहे. त्यांना आज येरवडा कारागृहातून सोडण्यात आलं. यावेळी त्यांची नातेवाईक त्यांना घ्यायला आले होते.

पूजा खेडकर हिची यूपीएससीने उमेदवारी रद्द केली आहे. हेच नाही तर पूजा खेडकर ही यूपीएससीच्या परीक्षा देखील देऊ शकणार नाहीये. पूजा खेडकरने नियमांचे उल्लंघन केल्याचे आणि त्यामध्ये दोषी आढळल्यामुळे ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. हा एकप्रकारे पूजा खेडकरला मोठा धक्काच देण्यात आलाय. हेच नाही तर पूजा खेडकरला यूपीएससीकडून दोषीकरार देखील देण्यात आलाय.

आयएएस म्हणून निवड झाल्यानंतर दोन वर्ष प्रशिक्षणाचा काळ असतो. त्या दरम्यान प्रशासन समजून घेणे, कामकाज समजून घेणे आणि इतर गोष्टी शिकणे अपेक्षित असते. परंतू यादरम्यान पूजा खेडकरने कॅबिनची मागणी केली आणि थेट आपल्या खासगी गाडीला अंबर दिव्या बसवला. जिल्हाधिकाऱ्यांनी थेट पूजा खेडकरची तक्रारही केली. पुण्याहून थेट वाशिमला पूजा खेडकर हिची बदली करण्यात आली होती.