
मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई उपनगरीय मुख्य मार्गिकेवरील कल्याण पलिकडचा लोकल प्रवास धकाधकीचा बनला आहे. त्यामुळे या मार्गावर सकाळ आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी लोकलमधून लोंबकळत जीवधोक्यात घालून प्रवास करावा लागतो आहे. यामुळे ऐन उमेदीच्या काळात लोकलमधून पडून तरुणांचे मृत्यू होत आहेत. पूर्वी सरासरी दहा जणांचे लोकल तिन्ही मार्गांवर मिळून बळी जायचे आता यात थोडी सुधारणा होता सरासरी आठ जणांचा बळी जात आहे. वर्षानुवर्षे रखडलेले प्रकल्प, जागेची अनुपलब्धता आणि निधीची कमतरता यामुळे ठाणे आणि कल्याण पलिकडील प्रवास जीवघेणा झाला आहे. मध्य रेल्वेच्या 29 किमीच्या पनवेल ते कर्जत ( Panvel to Karjat double line ) या नवीन उपनगरीय कॉरीडॉरमुळे रेल्वे प्रवाशांना मुंबई लवकर गाठण्यासाठी ‘सेंकड ऑप्शन’ उपलब्ध होणार आहे. मुंबई उपनगरीय रेल्वे नेटवर्कवर 28 किमीची कर्जत – पनवेल मार्गिका बांधली जात आहे. पनवेल-कर्जत ही दुहेरी रेल्वे मार्गिका आहे. या मार्गिकेवर एकूण 3,164 मीटरचे...