Rajendra Gavit: त्या उर्मट माणसाला धडा शिकवणार! राजेंद्र गावित यांचा थेट इशारा, पालघरमध्ये भाजप-शिंदे सेना वाद पेटला

Rajendra Gavit on Bharat Rajput: ठाणे, नवी मुंबईतील शिंदे सेना-भाजपमधील वादाचे लोण आता थेट पालघरपर्यंत पोहचले आहे. खासदार क्रीडा महोत्सवाच्या कार्यक्रमात महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्यानंतर आता राजकीय वातावरण तापले आहे. आमदार राजेंद्र गावित यांनी भाजप जिल्हाध्यक्षांना मोठा इशारा दिला आहे.

Rajendra Gavit: त्या उर्मट माणसाला धडा शिकवणार! राजेंद्र गावित यांचा थेट इशारा, पालघरमध्ये भाजप-शिंदे सेना वाद पेटला
त्या उर्मट माणसाला धडा शिकवणार! राजेंद्र गावित यांचा थेट इशारा
| Updated on: Nov 25, 2026 | 8:36 AM

Palghar BJP-Shivsena Conflict: पालघरमधील ‘खासदार क्रीडा महोत्सवाच्या’ कार्यक्रमात झालेल्या वादाचे पडसाद आता तीव्रतेने उमटू लागले आहेत. ठाणे, नवी मुंबईतील शिंदे सेना-भाजपमधील वादाचे लोण थेट पालघरपर्यंत पोहचले आहे. राजकीय वर्चस्ववादातून मुंबई लगतच्या पट्ट्यात महायुतीमधील दोन घटक पक्षात जोरदार धुमश्चक्री आणि राजकीय ठिणगी पडत आहेत. त्यात अजून एका वादाची भर पडली आहे. खासदार क्रीडा महोत्सवाच्या कार्यक्रमात महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्यानंतर आता राजकीय वातावरण तापले आहे. आमदार राजेंद्र गावित यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांना मोठा इशारा दिला आहे.

उर्मट माणसाला धडा शिकवणार

Loading...

या कार्यक्रमात भरत राजपूत यांनी आपला अपमान करून अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचा खळबळजनक आरोप आमदार राजेंद्र गावित यांनी केला आहे. इतकंच नाही, तर त्यांनी वापरलेले शब्द इतके घाणेरडे होते की, ते मी माध्यमांसमोरही उच्चारू शकत नाही, असं म्हणत गावित यांनी आपला संताप व्यक्त केलाय. त्यामुळे अशा उर्मट माणसाला धडा शिकवण्यासाठी आपण ‘ॲक्शन’ घेण्याच्या तयारीत असल्याचा थेट इशारा गावित यांनी दिला आहे.

त्यामुळे आमदार गावित आणि भरत राजपूत यांच्यातील वाद अधिक चिघळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. खासदार क्रीडा महोत्सवाच्या व्यासपीठावर सुरू झालेला हा वाद आता महायुतीच्या अंतर्गत संघर्षाला नवं वळण देणार का? आणि भाजपचे वरिष्ठ नेते या प्रकरणात काय भूमिका घेणार? याकडे आता संपूर्ण पालघर जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.

नेमका वाद काय?

पालघर जिल्ह्यातील खासदार क्रीडा महोत्सवादरम्यान शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेंद्र गावित आणि भाजप जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांच्या शा‍ब्दिक चकमक उडाली. या कार्यक्रमादरम्यान मंचावरच भरत राजपूत यांनी गावित यांना हा भाजपचा कार्यक्रम असताना मंचावर का आलात? असा सवाल केला. त्यामुळे सर्वच जण स्तब्ध झाले. गावित यांनी आपण मंत्री गणेश नाईक आणि खासदार हेमंत सावरा यांच्यासाठी या कार्यक्रमात आल्याचे सांगितले. दोन्ही नेत्यांमध्ये शा‍ब्दिक बाचाबाची झाली. पालकमंत्री गणेश नाईक यांनी या दोघांमध्ये मध्यस्थी केली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us