AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rakesh Jhunjhunwala Death: राकेश झुनझुनवाला यांच्या निधनाचा पोर्टफोलिओवर परिणाम, शेअर बाजार गडगडला

राकेश झुनझुनवाला यांनी 32 कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली होती. 12 ऑगस्टपर्यंतच्या आकडेवारीनुसार या कंपन्यांमधील त्यांच्या शेअरचे एकूण किंमत 32,000 कोटी रुपये होती. स्टार हेल्थ इन्शुरन्सचा शेअर आज सर्वात जास्त घसरला होता. तर शेवटच्या ट्रेडिंग दिवसभरानंतर क्लोज प्राईजची लना करता, त्याच्या शेअरमध्ये आज 4.79 टक्क्यांची घसरण झाली होती.

Rakesh Jhunjhunwala Death: राकेश झुनझुनवाला यांच्या निधनाचा पोर्टफोलिओवर परिणाम, शेअर बाजार गडगडला
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Aug 16, 2022 | 1:41 PM
Share

मुंबईः राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala Death)  यांच्या आकस्मिक निधनानंतर त्यांच्या पोर्टफोलिओमधील (portfolio) बहुतांश शेअर मंगळवारी शेअर बाजाराच्या (Share Market) प्रारंभीच घसरल्याचे दिसून आले. Aptech Ltd मध्येही सर्वात मोठी घसरण दिसून आली. प्रारंभी व्यापाराच्या दृष्टीने ते सुमारे 5 टक्क्यांनी घसरले होते तर स्टार हेल्थच्या शेअरमध्येही घट झाली. राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये एकूण 32 शेअर् होते. राकेश झुनझुनवाला यांनी टाइट कंपनीमध्ये सर्वाधिक गुंतवणूक केली होती तर आजाच्या शेअर मार्केटमध्ये आज प्रारंभीच्या व्यवहारात त्याच्या शेअरमध्ये 1.54 टक्क्यांची घसरण झाली होती. टायटन कंपनीचे शेअर बीएसई सेन्सेक्सवर रु. 2,433 वर व्यवहार चालू होता.

टायटनमध्ये मोठी गुंतवणूक

जून तिमाहीच्या शेवटी, झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा यांच्याकडे टायटनमधील 5.10 टक्के शेअरसह 11,086.9 कोटी रुपयांचे शेअर्स होते. 12 ऑगस्ट रोजी टायटनचा स्टॉक 0.01 टक्क्यांनी वाढून 2,471.95 रुपयांवर बंद झाला होता आणि फर्मचे मार्केट कॅप 2.19 लाख कोटी रुपये झाले होते. राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा यांच्याकडे भारतातील मल्टी-ब्रँड फुटवेअर रिटेल चेनमध्ये 3,348.8 कोटी रुपयांचे शेअर्स आहेत. जून तिमाहीच्या अखेरीस त्यांनी या फर्ममध्ये 14.40 टक्के शेअर घेतला होता. Aptech Ltd, ज्याची बिग बुलमध्ये 23.40 टक्के भागीदारी होती किंवा Q1 मध्ये 225 कोटी रुपयांची गुंतवणूक होती, तिचे समभाग आज बीएसईवर 3.67 टक्क्यांनी घसरून 224.20 रुपयांवर सुरू होते.

स्टार हेल्थध्ये मोठी घसरण

स्टार हेल्थ इन्शुरन्सच्या शेअरमध्येही घसरण झाली आहे. शेवटच्या व्यवहाराच्या दिवसाच्या क्लोज प्राईजच्या तुलनेत आज त्याचा शेअर एक टक्क्याने घसरला. तर सुरुवातीच्या बाजारात तो 662.75 रुपयांवर व्यवहार करत होता, तर तो 696.10 रुपयांवर बंद झाला. आज तो 660 रुपयांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला होता. राकेश झुनझुनवाला हे स्टार हेल्थचे प्रवर्तक होते. तर 12 ऑगस्ट रोजी शेअर 0.40 टक्क्यांनी वाढून 696.10 रुपयांवर बंद झाला.

क्रिसिलचे शेअरही घसरले

क्रिसिल लिमिटेडचा शेअर बीएसईवर 0.56 टक्क्यांनी घसरून 3,243 रुपयांवर पोहोचला होता, जो आधीच्या 3261.60 रुपयांवर बंद झाला होता. झुनझुनवाला यांनी जून तिमाहीत क्रेडिट रेटिंग फर्ममध्ये 1,301.9 कोटी रुपयांची हिस्सेदारी ठेवली होती. 12 ऑगस्ट रोजी त्याचे शेअर 1.30 टक्क्यांनी घसरून 3,261.60 रुपयांवर बंद झाले होते. मेट्रो ब्रँड्समध्येही 0.5 टक्क्यांची घसरण झाली

अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक

राकेश झुनझुनवाला यांनी 32 कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली होती. 12 ऑगस्टपर्यंतच्या आकडेवारीनुसार या कंपन्यांमधील त्यांच्या शेअरची एकूण किंमत 32,000 कोटी रुपये होती. राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओबद्दल सांगायचे तर, त्यांनी स्वतःची फर्म Rare Enterprises स्थापन केली आणि त्याद्वारे अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली होती.

टाटा कंपनीच्या शेअर्सनी बनवले ‘बिग बुल’

राकेश झुनझुनवाला यांना ‘बिग बुल’ बनवण्यात टाटा समूहाच्या कंपनीच्या शेअर्सचा मोठा वाटा होता, ज्यांनी 1985 मध्ये शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. त्यांनी प्रथम टाटा टीचे 5000 शेअर्स 43 रुपये प्रति शेअर या दराने खरेदी केले होते. त्यानंतर अवघ्या तीन महिन्यांतच शेअरचा भाव 43 रुपयांवरून 143 रुपयांवर पोहोचला होता. यानंतर त्यांनी 2002-03 मध्ये टायटनचे शेअर्स सरासरी फक्त 3 रुपये किंमतीत खरेदी केले होते मात्र सध्या तेच टायटन स्टॉक्सची किंमत 2,400 रुपयांपेक्षा जास्त असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत