AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MLC Election 2022: राम शिंदे, सचिन अहिर, आमशा पाडवी, श्रीकांत भारतीय, एकनाथ खडसे विजयी, पहिला निकाल भाजप, राष्ट्रवादीच्या बाजूने

MLC Election 2022: आपले उमेदवार विजयी होणार याची भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांना खात्री होती. त्यामुळे या तिन्ही पक्षांनी निकाला आधीच विजयाचा गुलाल उधळण्यास सुरुवात केली होती. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे मतदानानंतर नागपूरला रवाना झाले.

MLC Election 2022: राम शिंदे, सचिन अहिर, आमशा पाडवी, श्रीकांत भारतीय, एकनाथ खडसे विजयी, पहिला निकाल भाजप, राष्ट्रवादीच्या बाजूने
राम शिंदे, सचिन अहिर, आमशा पाडवी, श्रीकांत भारतीय, एकनाथ खडसे विजयीImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jun 20, 2022 | 10:04 PM
Share

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (eknath khadse) आणि राम शिंदे (ram shinde) यांचं संसदीय राजकारणात पुनरागमन झालं आहे. हे दोन्ही नेते विधान परिषदेच्या निवडणुकीत विजयी झाले आहेत. तसेच सचिन अहिर (sachin ahir), आमशा पाडवी, श्रीकांत भारतीय, प्रसाद लाड, उमा खापरे, प्रवीण दरेकर, श्रीकांत भारतीय, चंद्रकांत हंडोरे आणि रामराजे नाईक निंबाळकर हे या निवडणुकीत विजयी झाले आहेत. प्रसाद लाड आणि काँग्रेसचे भाई जगताप यांच्यात चुरशीची लढत सुरू आहे. या दोन्ही उमेदवारांची मते अद्याप जाहीर झाली नाहीत. या निवडणुकीत काँग्रेसची दोन मते फुटल्याची चर्चा आहे. एकीकडे खडसे, राम शिंदे यांचा विजय होताच त्यांच्या समर्थकांनी प्रचंड जल्लोष केला आहे. मुक्ताईनगरात तर दिवाळी साजरी होत आहे.

दुपारी 4 वाजता मतदान संपलं. त्यानंतर संध्याकाळी सव्वा सातच्या सुमारास मतमोजणीस सुरुवात होणार झाली. मतमोजणीच्या वेळी राष्ट्रवादी आणि भाजपचं प्रत्येकी एक एक मत बाद झालं. भाजपच्या उमा खापरे आणि राष्ट्रवादीचे रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मत पत्रिकेत खाडाखोड करण्यात आल्याने ही दोन्ही मते बाद करण्यात आली आहेत. त्यामुळे भाजपचा उमेदवार पडणार की काय अशी शक्यता वर्तवली जात होती. पण भाजपने प्रत्येक उमेदवारासाठी कोटा ठरवून दिला होता, त्यामुळे गणित कुठे तरी चुकतं की काय असं वाटत होतं. मात्र, उमा खापरे या 26 मते घेऊन विजयी झाल्या आहेत.

विजयी उमेदवार आणि त्यांना मिळालेली मते

भाजप उमेदवार

1) प्रवीण दरेकर -26 2) राम शिंदे -26 3) श्रीकांत भारतीय – 26 4) उमा खापरे -26 5) प्रसाद लाड – 26

शिवसेना

1) सचिन अहिर -26 2) आमशा पाडवी- 26

काँग्रेस

1) चंद्रकांत हंडोरे -26

राष्ट्रवादी

1) रामराजे नाईक निंबाळकर-26 2) एकनाथ खडसे-27

पराजय होणार आधीच कळंल होतं?

दरम्यान, आपले उमेदवार विजयी होणार याची भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांना खात्री होती. त्यामुळे या तिन्ही पक्षांनी निकाला आधीच विजयाचा गुलाल उधळण्यास सुरुवात केली होती. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे मतदानानंतर नागपूरला रवाना झाले. उमेदवार विजयी होण्याची खात्री नव्हती म्हणूनच पटोले नागपूरला गेले होते काय? अशी चर्चा आता सुरू झाली आहे. दरम्यान, भाई जगताप की प्रसाद लाड याचा फैसला अद्याप झालेला नाही.

पार्थ पवारांवर गुन्हा का नाही?जमीन गैरव्यवहार प्रकरणी हायकोर्टाचा सवाल
पार्थ पवारांवर गुन्हा का नाही?जमीन गैरव्यवहार प्रकरणी हायकोर्टाचा सवाल.
सोमय्या भाजपवर नाराज...2019चा अपमान विसरलो नाही, बड्या नेत्यावर निशाणा
सोमय्या भाजपवर नाराज...2019चा अपमान विसरलो नाही, बड्या नेत्यावर निशाणा.
निधीवरून महायुतीतच चकमक, विधान परिषदेत भाजपची अजितदादांवर नाराजी
निधीवरून महायुतीतच चकमक, विधान परिषदेत भाजपची अजितदादांवर नाराजी.
'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'
'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'.
हा महाराष्ट्राचा तोटा, 1 नंबरचा आमचा माणूस... जयंत पाटील काय म्हणाले?
हा महाराष्ट्राचा तोटा, 1 नंबरचा आमचा माणूस... जयंत पाटील काय म्हणाले?.
चलान कट करताना होणारे वाद आता मिटणार, कारण...फडणवीस यांची मोठी घोषणा
चलान कट करताना होणारे वाद आता मिटणार, कारण...फडणवीस यांची मोठी घोषणा.
अण्णा हजारे यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध; म्हणाले, कुंभमेळा....
अण्णा हजारे यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध; म्हणाले, कुंभमेळा.....
"'लाडकी बहीण' बंद व्हावी म्हणून कोर्टात जाणारा नानांचा माणूस..."
गोगावलेंचा पैशांसोबत फोटो, महिला नेत्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ!
गोगावलेंचा पैशांसोबत फोटो, महिला नेत्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ!.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार, तारीख काय? शिंदेंनी थेट सांगितलं...
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार, तारीख काय? शिंदेंनी थेट सांगितलं....