रामदास आठवलेंकडून आरे कॉलनीतील बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांची भेट, 50 हजार रुपयांच्या मदतीची घोषणा

| Updated on: Oct 08, 2020 | 4:37 PM

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आरे कॉलनी प्रकरणातील पीडित कुटुंबाची भेट घेतली आहे (Ramdas Athawale meet victim family of Aarey colony rape case ).

रामदास आठवलेंकडून आरे कॉलनीतील बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांची भेट, 50 हजार रुपयांच्या मदतीची घोषणा
Follow us on

मुंबई : मुंबईतील आरे कॉलनीत मजुरी करणाऱ्या दाम्पत्यांच्या अवघ्या साडेचार वर्षांच्या चिमुकलीवर बलात्काराची धक्कादायक घटना घडली. यानंतर रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी या प्रकरणातील पीडित कुटुंबाची भेट घेतली आहे (Ramdas Athawale meet victim family of Aarey colony rape case ). तसेच त्यांना 50 हजार रुपयांच्या मदतीची घोषणा केली. यावेळी रामदास आठवले यांनी हा अमानुष प्रकार करणाऱ्या गुन्हेगारांना फाशीची कठोर शिक्षा देण्याची मागणी केली.

बलात्काराचे असे घृणास्पद प्रकार रोखण्यासाठी बलात्कार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा करण्याची मागणी रामदास आठवले यांनी केली आहे. तसेच त्यासाठी कायदा करुन गुन्हेगारांमध्ये जरब बसवावी, असं मत व्यक्त केलं.

आरे कॉलनी येथील युनिट नंबर 32 येथ साडेचार वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्याची अमानुष घटना घडली. अत्याचार पीडित मुलगी रुग्णालयात दाखल आहे. सध्या तिची प्रकृती स्थिर आहे. याची माहिती मिळाल्यानंतर रामदास आठवले यांनी पीडित मुलीच्या कुटुंबियांची त्यांच्या आरे कॉलनीतील निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

रिपब्लिकन पक्षाकडून पीडित मुलीच्या कुटुंबाला 50 हजार रुपयांची तातडीची मदत देण्यात येणार असल्याचं आश्वासन रामदास आठवले यांनी दिलं. यावेळी रिपाइंचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश जाधव, विजय कांबळे, धनराज, अॅड. अभया सोनवणे, उषा रामळु आदी रिपाइं पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित बातम्या :

रामदास आठवलेंकडून हाथरस पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट

नटीच्या घराची कौलं उडवली तरी आंदोलन, हाथरस प्रकरणानंतर आठवले कुठे गेले? संजय राऊतांचा निशाणा

सुशांतची हत्या झाली नाही असं AIIMS बोलू शकत नाही : रामदास आठवले

Ramdas Athawale meet victim family of Aarey colony rape case