AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज यांच्या अयोध्या दौऱ्याबाबत उ. प्रदेशातून समर्थनाचे खूप फोन येत आहेत, एकाचा विरोध, सगळ्यांचा कसा?, मनसेचा सवाल

दीपाली सय्यद यांच्यावरही नांदगावकरांनी टीका केली आहे. त्या मोठ्या नेत्या आहेत. आणि आता संजय राऊत यांच्यानंतर त्याच आता पक्षात ज्येष्ठ आहेत

राज यांच्या अयोध्या दौऱ्याबाबत उ. प्रदेशातून समर्थनाचे खूप फोन येत आहेत, एकाचा विरोध, सगळ्यांचा कसा?, मनसेचा सवाल
Bala nandgaonkar on Ayodhya tourImage Credit source: TV 9 marathi
| Edited By: Sandip Sakhare | Updated on: May 19, 2022 | 8:23 PM
Share

मुंबई– मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray)यांच्या अयोध्या (Ayodhya tour)दौऱ्याबाबत उ. प्रदेशातून आम्हाला खूप फोन (calls from Uttar Pradesh)येत आहेत, तिथल्या जनतेचा आम्हाला पाठिंबा आहे, असं मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितलंय. एकाचा विरोध हा सगळ्यांचा विरोध कसा असून शकेल, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. अयोध्येचे भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याविरोधात उ. प्रदेशात मोहीमच उघडली आहे. दररोज ते राज ठाकरेंवर टीका करीत आहेत. राज ठाकरे जोपर्यंत उ. भारतीयांची माफी मागणार नाहीत तोपर्यंत त्यांना अयोध्येत प्रवेश दिला जाणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून राजकारण चांगलचं तापलेलं आहे. बृजभूषण टीका करत असताना मात्र मनसेकडून त्यांना फारसं प्रत्युत्तर दिलं जात नाहीये.

विरोधानंतरही मनसे शांत

खासदार बृजभूषण सिंह हे भाजपाचे खासदार आहेत, त्यांना योग्य वेळी भाजपा शांत करेल असे मानले जाते आहे. त्यामुळे मनेसकडून बृजभूषण यांना उत्तरं दिलं जात नाहीये. उलट अयोध्या दौऱ्याबाबत पक्षातील सगळ्यांनी बोलू नये, असे आदेश राज ठाकरे यांनी दोन आठवड्यापूर्वी काढले होते. बृजभूषण यांच्या टीकेनंतर पहिल्यांदाच मनसेच्या मोठ्या नेत्याने याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. मात्र त्यातही त्यांनी बृजभूषण यांचे नाव घेण्याचे टाळले आहे.

दीपाली सय्यद यांच्यावरही टीका

राज ठाकरे यांना उ. प्रदेशात जाण्याची भीती वाटत असेल, तर त्यांनी आदित्य ठाकरेंचा हात हातात घेऊन जावे, अशी टीका करणाऱ्या शिवसेनेच्या प्रवक्त्या दीपाली सय्यद यांच्यावरही नांदगावकरांनी टीका केली आहे. त्या मोठ्या नेत्या आहेत. आणि आता संजय राऊत यांच्यानंतर त्याच आता पक्षात ज्येष्ठ आहेत, अशा शब्दांत नांदगावकरांनी सय्यद यांच्यावर टीका केली आहे.

राज्यसभा निवडणुकीसाठी अद्याप संपर्क नाही

राज्यसभा निवडणुकांसाठी अद्याप पक्षाशी संपर्क झालेला नाही. मनसेचा एकच आमदार आहे. त्यामुळे संभाजीराजे यांच्याकडूनही काही संपर्क झाला नसल्याचे नांदगावकरांनी सांगितले आहे. त्या निवडणुकीत पक्षाचा फारसा सहभाग नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

राज ठाकरेंचा ५ जूनला अयोध्या दौरा

 राज ठाकरे येत्या ५ जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यापूर्वी २२ मे रोजी रविवारी पुण्यात सकाळी त्यांची सभा होणार आहे. या सभेत राज बृजभूषम सिंह यांच्या टीकेला उत्तर देण्याची शक्यता आहे. मनसैनिकांना घएऊन मोठ्या संख्येने अयोध्या दौरा राज ठाकरे करतील.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?