रेणू शर्माची प्रतिमा मलिन करण्यासाठीच आरोप; रेणूच्या वकिलाचा दावा

| Updated on: Jan 15, 2021 | 4:14 PM

मुंडे प्रकरणातील सर्व पुरावे पोलिसांना देऊ," असेही त्यांनी स्पष्ट केले. (Ramesh Tripathi Comment About Honey Trap allegations)

रेणू शर्माची प्रतिमा मलिन करण्यासाठीच आरोप; रेणूच्या वकिलाचा दावा
Follow us on

मुंबई : “रेणू शर्मा यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी त्यांच्यावर आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे ही केस कमकुवत करण्याचा प्रयत्न होत आहे,” असा दावा रेणू शर्मा यांचे वकिल रमेश त्रिपाठी यांनी केला. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप करणाऱ्या रेणू शर्मा यांच्या वकिलांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हनी ट्रॅपच्या आरोपावर प्रतिक्रिया दिली. (Renu Sharma Advocate Ramesh Tripathi Comment About Honey Trap allegations)

“रेणू शर्मा यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी रेणूवर आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे ही केस कमकुवत करण्याचा प्रयत्न होत आहे. पण त्यावर त्याच उत्तर देतील. हनी ट्रॅप वैगरे काहीही नाही. जे आरोप आम्ही वाचले आहेत. त्या हनी ट्रॅप करण्याचा प्रयत्न केला गेला, असं म्हटलं जात आहे. मात्र असं काहीही केलेलं नाही,” असेही रेणू शर्मा यांचे वकिल रमेश त्रिपाठी म्हणाले.

“या केसवरुन दुसरीकडे लक्ष वळवण्यासाठी हा प्रकार केला जात आहे. धनंजय मुंडे दबाव टाकत आहे. त्यामुळे पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी,” अशी मागणी रेणूच्या वकिलांनी केली.

“रेणूवरील आरोप केवळ मीडियातून आले आहेत. त्याबाबत कुणीही आम्हाला नोटीस दिलेलं नाही. जेव्हा नोटीस येईल तेव्हा बघू. मुंडे प्रकरणातील सर्व पुरावे पोलिसांना देऊ. मीडियाला देणार नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

“करूणा आणि रेणू शर्मा या दोन वेगवेगळ्या केसेस आहेत. त्या दोघी सख्ख्या बहिणी आहेत. याचा अर्थ एकीशी लग्न झाल्याने दुसरीवर बलात्कार करण्याचा अधिकार मिळत नाही. रेणूवर बलात्कार केला. त्याचा व्हिडीओ काढला. हा व्हिडीओ व्हायरल होऊ नये म्हणून तिने केस दाखल केली नव्हती. मात्र उद्या याबाबत एफआयआर दाखल करु. जर तक्रार दाखल करण्यात आली नाही, तर कोर्टात जाऊ,” असेही रेणूचे वकिल रमेश त्रिपाठी यांनी सांगितले.

“या प्रकरणानंतर मला धमक्या देण्यात येत आहेत. काल सायंकाळी साडेसात वाजल्यापासून धमक्यांचे फोन येत आहेत. तुम्ही केस सोडा, त्यांच्याविरोधात केस लढू नका असं धमकावलं जात आहे. मला फोनवरुन शिव्या घातल्या जात आहेत
वकिलाला घाबरवण्यापेक्षा कोर्टात जावं,” असेही ते म्हणाले.  (Renu Sharma Advocate Ramesh Tripathi Comment About Honey Trap allegations)

संबंधित बातम्या : 

Dhananjay Munde case | ‘जिनके घर शीशे के होते हैं’, पवारांपाठोपाठ राऊतांचाही भाजपला इशारा

Dhananjay Munde case | धनंजय मुंडेंसाठी फडणवीसांची ढाल; पवारांकडून भाजपची कोंडी