AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

थकबाकीसाठी मुंबईतील निवासी डॉक्टर आक्रमक; सोशल मीडियावरून जोरदार कॅम्पेन सुरू

मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात काम करणाऱ्या निवासी डॉक्टरांना गेल्या नऊ महिन्यांपासूनचा अतिरिक्तक भत्ता देण्यात आला नाही. (Resident doctors from BMC hospitals demand arrears in stipends)

थकबाकीसाठी मुंबईतील निवासी डॉक्टर आक्रमक; सोशल मीडियावरून जोरदार कॅम्पेन सुरू
प्रातिनिधीक फोटो
| Updated on: May 08, 2021 | 8:28 AM
Share

मुंबई: मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात काम करणाऱ्या निवासी डॉक्टरांना गेल्या नऊ महिन्यांपासूनचा अतिरिक्तक भत्ता देण्यात आला नाही. हा भत्ता न मिळाल्याने निवासी डॉक्टर संतप्त झाले असून त्यांनी लवकरात लवकर थकीत रक्कम न मिळाल्यास कोविड सेवेचं काम करणार नसल्याचा इशारा दिला आहे. तसेच थकीत रक्कम मिळावी म्हणून या डॉक्टरांनी सोशल मीडियावरून जोरदार कॅम्पेनही सुरू केली आहे. (Resident doctors from BMC hospitals demand arrears in stipends)

पालिकेच्या निवासी डॉक्टरांनी थकीत रकमेसाठी महापालिकेला काम बंद करण्याचा इशारा दिल्यानंतर सोशल मीडियावरून कॅम्पेन सुरू केलं आहे. त्यामुळे कालपासून सोशल मीडियावर #BMCbetrayedus आणि #BetrayedStillWorking हा हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये आला आहे. येत्या सात दिवसात आमच्या थकीत रकमेवर तोडगा न काढल्यास कोरोनाचे काम करणार नसल्याचा इशारा मार्डने दिला आहे.

तोपर्यंत आंदोलन सुरूच

आम्हाला कोरोना रुग्णांची सेवा थांबवायची नाही. त्यामुळे पालिका आम्हाला तसे करण्यास प्रवृत्त करणार नाही याची आशा आहे. आम्ही आमच्या मागण्यांची पोस्टर्स हॉस्पिटलबाहेर लावली आहेत. प्रश्न मार्गी लागेपर्यंत आमचं आंदोलन आम्ही सुरूच ठेवू, असं मार्डचे मुंबईचे अध्यक्ष अरुण घुले यांनी सांगितलं.

3 हजार डॉक्टर वंचित

मुंबई महापालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या सायन, नायर, केईएम आणि कुपर रुग्णालयातील निवासी डॉक्टरांना पालिकेकडून त्यांना देण्यात येणारा 10 हजार रुपये कोविड भत्ता हीच पगारवाढ असून गेल्या 9 महिन्यांपासून देण्यात आलेली नाही. मे 2020 मध्ये सरकारी निवासी डॉक्टरांचा पगार म्हणजे विद्यावेतन 1 हजार रुपयांनी वाढवले तरी पालिका रुग्णालयातील 3000 डॉक्टरांना दहा हजार रुपयांची पगारवाढ मिळालेली नाही. ही थकबाकी लवकरात लवकर मिळावी अशी या डॉक्टरांची मागणी आहे. गेल्यावर्षी पहिल्या लाटेच्यावेळीच हा भत्ता मिळणार होता. मात्र, तो अजून देण्यात आलेला नसल्याचं या डॉक्टरांचं म्हणणं आहे. थकबाकीपोटी प्रत्येक डॉक्टरांचे प्रत्येकी सुमारे 1.2 लाख रुपये थकले आहेत, असं मार्डने स्पष्ट केलं. (Resident doctors from BMC hospitals demand arrears in stipends)

संबंधित बातम्या:

VIDEO: म्हणे, नियमित गोमूत्र प्यायल्याने कोरोना जातो; भाजप आमदाराचा व्हिडीओ व्हायरल

Maharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण? कुठे निर्बंध?

धक्कादायक! कोरोनानं वडिलांच्या निधनानंतर संपूर्ण कुटुंबाची सामूहिक आत्महत्या

(Resident doctors from BMC hospitals demand arrears in stipends)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.