AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: म्हणे, नियमित गोमूत्र प्यायल्याने कोरोना जातो; भाजप आमदाराचा व्हिडीओ व्हायरल

आपल्या बेताल वक्तव्यांनी प्रसिद्ध असलेले भाजपचे आमदार सुरेंद्र सिंह पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. (BJP MLA recommends drinking cow urine to stop Covid spread)

VIDEO: म्हणे, नियमित गोमूत्र प्यायल्याने कोरोना जातो; भाजप आमदाराचा व्हिडीओ व्हायरल
Surendra Singh
| Updated on: May 08, 2021 | 7:59 AM
Share

लखनऊ: आपल्या बेताल वक्तव्यांनी प्रसिद्ध असलेले भाजपचे आमदार सुरेंद्र सिंह पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सुरेंद्र सिंह यांनी भर कॅमेऱ्यासमोर गोमूत्र प्राशन केलं. बरं ते एवढ्यावरच थांबले नाहीत, तर दररोज गोमूत्रं प्राशन केल्याने कोरोना होत नाही, असं धक्कादायक विधान केलं आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. सिंह यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. (BJP MLA recommends drinking cow urine to stop Covid spread)

सुरेंद्र सिंह यांनी कॅमेऱ्यासमोर गोमूत्र प्राशन केलं. गोमूत्रं प्यायल्याने मी ठणठणीत आहे. बेरिया विधानसभेतील नागरिकांनी सुद्धा गोमूत्र प्यावं. हा पातंजलिचा गोधन अर्क आहे. मी रोज सकाळी रिकाम्या पोटी पाच बूच गोमूत्रं थंड पाण्यात मिसळून पितो. त्याचे वैज्ञानिक तत्व काय आहेत हे मला माहीत नाही. मात्र, गोमूत्र प्राशन करून मी 18 तास तुमच्यासोबत असतो, असं ते म्हणाले.

पूर्वजांच्या मार्गावर जा

गोमूत्र किंवा गोधन अर्कचं प्राशन केल्यानंतर कोरोनासारख्या आजारांना नियंत्रित केलं जाऊ शकतं. यावर माझा पूर्ण विश्वास आहे. विज्ञानाने त्याचा स्वीकार करो अथवा न करो. विज्ञानाचा एवढा विकास होऊनही लोक या महामारिने मरत आहेत. सर्व काही फेल झालं आहे. अशावेळी मानवाने देवावर विश्वास ठेवून आपल्या पूर्वजांच्या मार्गावर गेलं पाहिजे. ही 50 रुपयांना बॉटल मिळते. दहा दिवस ही बॉटल पुरते. जर तुम्ही बॉटल घेऊ शकत नसाल तर एखाद्या गायीचं गोमूत्रं नियमित प्राशन करा. मी माझा वैयक्तिक अनुभव तुमच्यापुढे ठेवत आहे, असं सिंह यांनी म्हटलं आहे.

गोमूत्रं कसे प्यावे

सिंह गोमूत्र पिऊनच नुसते थांबले नाहीत. तर गोमूत्र कसे प्यावे, याची माहितीही त्यांनी दिली. सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी एक ग्लास पाण्यात दोन ते तीन बूच गोमूत्र टाका. त्यानंतर ते प्या. गोमूत्र प्यायल्यानंतर अर्धातास काहीच खाऊ नका, असं त्यांनी सांगितलं. त्याशिवाय त्यांनी हळद गरम करून त्याची पावडर करून सेवन करा. त्याने बराच फायदा होतो, असा दावाही त्यांनी केला आहे. (BJP MLA recommends drinking cow urine to stop Covid spread)

संबंधित बातम्या:

आसामचे मुख्यमंत्री कोण?, सर्बानंद आणि हिंमत बिस्वा सरमा यांना दिल्लीत बोलावलं; आज फैसला

Maharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण? कुठे निर्बंध?

धक्कादायक! कोरोनानं वडिलांच्या निधनानंतर संपूर्ण कुटुंबाची सामूहिक आत्महत्या

(BJP MLA recommends drinking cow urine to stop Covid spread)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.