AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आई-वडिलांना त्रास देणाऱ्या मुलाला हायकोर्टाचा दणका; घर परत करण्याचा आदेश… मुलाची याचिका फेटाळली, प्रकरण तरी काय?

Mumbai High Court: लाडक्या मुलाने आई-वडिलांचा वृद्धापकाळात सांभाळ करण्याऐवजी त्यांनाच त्रास देणे सुरू केले. ज्या घरात तो लहानचा मोठा झाला, त्यातूनच त्याने पालकांना बेदखल केले. त्यांना घराबाहेर हाकलले. या मुलाला हायकोर्टाने दणका दिला आहे. काय आहे हे प्रकरण?

आई-वडिलांना त्रास देणाऱ्या मुलाला हायकोर्टाचा दणका; घर परत करण्याचा आदेश... मुलाची याचिका फेटाळली, प्रकरण तरी काय?
आई-वडिलांना त्रास देणाऱ्या मुलाला हायकोर्टाचा दणका
| Updated on: Jul 09, 2026 | 11:52 AM
Share

Mumbai High Court order: लाडक्या मुलाची प्रत्येक हट्ट पूर्ण करणाऱ्या पालकांनाच मुलाने छळले. आई-वडिलांनी मौठ्या हौसेने मुलाला घर गिफ्ट केले. त्याच घरातून मुलाने त्यांना हाकलले. त्यांना घराबाहेर हाकलले. त्यानंतर पालकांनी मुलाविरोधात ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरणात धाव घेतली होती. न्यायधिकरणाने मुलाविरोधात निकाल दिला. पालकांना घर परत करण्याचे आदेश दिले होते. त्याविरोधात मुलाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्याला हायकोर्टाने जोरदार चपराक लगावली. त्याची याचिका फेटाळली. मुलाला घर सोडण्याचे ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरणाचा आदेश कायम ठेवला.

काय आहे प्रकरण?

प्रकरणातील वडिलांचे सोन्या-चांदीचे दुकान आहे. त्यांनी वृद्धापकाळात मुलाने सांभाळ करावा या अटीवर त्याला त्यांचे राहते घर गिफ्ट केले होते. घर मिळेपर्यंत मुलाचा कुठलाही त्रास झाला नाही. पण त्यानंतर मुलांचे आणि आई-वडिलांमध्ये खटके उडाले. मुलांने आई-वडिलांना घराबाहेर काढले. गिफ्ट दिलेल्या घरातून त्यांना बाहेर हाकलले.

आई-वडिलांची न्यायाधिकरणात धाव

प्रकरणात आई-वडिलांनी ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरणात धाव घेतली. गिफ्ट म्हणून मिळालेल्या घराचा ताबा सोडण्यास नकार देणाऱ्या मुलाकडून घर परत मिळण्याची अर्जव केली. न्यायाधिकरणाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यावर मुलाला घर परत करण्याचे आदेश दिले. गिफ्ट मिळालेले घर परत करण्याच्या या आदेशाला मुलाने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. वडिलांचे ज्वेललर्सचे दुकान आहे. त्यांच्याकडे मालमत्ता आहे. ते आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत. त्यांची काळजी घेण्याची कोणताही गरज नाही, असा दावा त्याने हायकोर्टात दाखल याचिकेत केला.

हायकोर्टाची मुलाला जोरदार चपराक

मुंबई उच्च न्यायालयाचे हंगामी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्या. गौतम अखंड यांच्यासमोर याचिकेवर सुनावणी झाली. मुलाचा युक्तीवाद कोर्टाने ऐकला. ज्येष्ठ नागरिक कल्याण कायद्याचा आधार घेत न्यायालयाने मुलाला घर परत करण्याचे आदेश दिले. आई-वडिलांची काळजी घेण्याच्या हमीवरच हे घर गिफ्ट दिल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायाधिकरणाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश हायकोर्टाने मुलाला दिले. मुलाची याचिका न्यायालयाने फेटाळली.

Follow Us
पहिल्या हायड्रोजन ट्रेनला PM मोदींकडून उद्या हिरवा कंदील
Hydrogen Train | भारतीय रेल्वेची ऐतिहासिक झेप! पहिल्या हायड्रोजन ट्रेनला PM मोदींकडून उद्या हिरवा कंदील
भरधाव कारचा भीषण अपघात! दुभाजकावर धडकून वाहन पलटी; 5 जण जखमी
Bhandara | भरधाव कारचा भीषण अपघात! दुभाजकावर धडकून वाहन पलटी; 5 जण जखमी
मोठी बातमी! मोटेगावकरबाबत CBI ला वेगळाच संशय; NEET पेपरफुटी प्रकरणी...
मोठी बातमी! मोटेगावकरबाबत CBI ला वेगळाच संशय; NEET पेपरफुटी प्रकरणी धक्कादायक खुलासा
एकनाथ शिंदेंची पुन्हा दिल्लीवारी, राज्याच्या राजकारणात मोठं घडणार? थेट
एकनाथ शिंदेंची पुन्हा दिल्लीवारी, राज्याच्या राजकारणात मोठं घडणार? थेट...
चेंबूर दुर्घटनेवर मनसे आक्रमक! BMC दोषींना वाचवतंय?
Sandeep Deshpande | चेंबूर दुर्घटनेवर मनसे आक्रमक! BMC दोषींना वाचवतंय? संदीप देशपांडेंचा गंभीर आरोप; मनसेचा आंदोलनाचा इशारा
डिलिमिटेशन बाबत ठाकरे गटाचा निर्णय बदलणार? संजय राऊतांच्या विधानाने
Sanjay Raut | डिलिमिटेशन बाबत ठाकरे गटाचा निर्णय बदलणार? संजय राऊतांच्या विधानाने चर्चांना उधाण
ही शांतता स्मशान शांततेकडे नेईल; राज ठाकरेंची केंद्रावर बोचरी टीका!
ही शांतता स्मशान शांततेकडे नेईल; राज ठाकरेंची केंद्रावर बोचरी टीका! सोनम वांगचुकांच्या आंदोलनाला मनसेचा जाहीर पाठिंबा
मोठी खळबळ! 'त्या' कारणावरून महायुतीचा नेता नाराज? बंडखोर नेत्याची थेट
मोठी खळबळ! 'त्या' कारणावरून महायुतीचा नेता नाराज? बंडखोर नेत्याची थेट एकनाथ शिंदेंकडे धाव...
हसन मुश्रीफांचा संजय मंडलिकांना पुन्हा मैत्रीचा हात; कोल्हापुरात नवी..
मोठी राजकीय घडामोड! हसन मुश्रीफांचा संजय मंडलिकांना पुन्हा मैत्रीचा हात; कोल्हापुरात नवी राजकीय समीकरणं?
फडणवीस-तटकरे भेटीची सुनेत्रा पवारांना कल्पनाच नव्हती?
NCP | राष्ट्रवादीत इनसाईड स्टोरी! फडणवीस-तटकरे भेटीची सुनेत्रा पवारांना कल्पनाच नव्हती? राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?
मी उपोषण सोडल्याने काय बदलेल? तब्येत खालावल्यानंतरही सोनम वांगचूक उपोषणावर ठाम, हायकोर्टाकडूनही चिंता व्यक्त.

मी उपोषण सोडल्याने काय बदलेल? तब्येत खालावल्यानंतरही सोनम वांगचूक उपोषणावर ठाम, हायकोर्टाकडूनही चिंता व्यक्त

NSA Ajit Doval : यावेळी चीन-पाकिस्तान नाही, तर भारताशेजारच्या छोट्या देशाला अजित डोवाल यांची डायरेक्ट वॉर्निंग, तुमच्या देशातून जर...

NSA Ajit Doval : यावेळी चीन-पाकिस्तान नाही, तर भारताशेजारच्या छोट्या देशाला अजित डोवाल यांची डायरेक्ट वॉर्निंग, तुमच्या देशातून जर..

Raj Thackrey : सोनम वांगचुकसाठी राज ठाकरे मैदानात, थेट पोस्ट करत म्हणाले, किती दिवस पंतप्रधान आहात….

Raj Thackrey : सोनम वांगचुकसाठी राज ठाकरे मैदानात, थेट पोस्ट करत म्हणाले, किती दिवस पंतप्रधान आहात…

अमिताभ बच्चन यांच्यावर जीवे मारण्याचे आरोप, 3 दिवस खोलीत सडत राहिला अभिनेत्रीचा मृतदेह, स्मोकिंगमुळे मिळालेला पहिला सिनेमा.

अमिताभ बच्चन यांच्यावर जीवे मारण्याचे आरोप, 3 दिवस खोलीत सडत राहिला अभिनेत्रीचा मृतदेह, स्मोकिंगमुळे मिळालेला पहिला सिनेमा

लव्ह मॅरेज केले म्हणून नोकरीवरुन काढले, रेल्वे स्टेशनवर काढावे लागले दिवस.

लव्ह मॅरेज केले म्हणून नोकरीवरुन काढले, रेल्वे स्टेशनवर काढावे लागले दिवस

एकनाथ शिंदे दिल्ली दाैऱ्यावर, ओमराजे निंबाळकर की संजय जाधव कोणाला मिळणार मंत्रिपद, घडामोडींना वेग...

एकनाथ शिंदे दिल्ली दाैऱ्यावर, ओमराजे निंबाळकर की संजय जाधव कोणाला मिळणार मंत्रिपद, घडामोडींना वेग..