
Rohit Pawar on V K Singh VSR Company: दिवंगत अजितदादांचा विमान अपघात की घातपात याविषयावरून आमदार रोहित पवार यांनी रान उठवलं आहे. रोहित पवार यांच्या रोखठोक सवालांना तोंड देता देता तपास यंत्रणांची भांबेरी उडल्याचे दिसून येत आहे. थातुरमातूर तपास करण्याचा प्रयत्नही रोहित पवार यांनी पुरव्यानिशी समोर आणल्याने या यंत्रणा दबावात आल्या आहेत. तर काल व्हीएसआर कंपनीचा मालक व्ही. के. सिंग हा पुण्यात सीआयडी कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाला की पाहुणचारासाठी असा सवाल उपस्थित करत रोहित पवार यांनी सीआयडीच्या व्हिआयपी ट्रिटमेंटवर मोठा सवाल उपस्थित केला आहे.
अजितदादांच्या विमान अपघाताचा एफआयआर का नाही?
नक्कीच आपल्याला अजितदादांना न्याय देता येईल. पण साधा एफआयआर जर महाराष्ट्रात होत नसेल. घाटकोपरला जो २०१९ मध्ये जो काही अपघात झाला. विमानाचा अपघात झाला होता. भाजप नेते किरीट सोमय्या तिथं गेल्यानंतर एफआयआर घेतला गेला. त्या एफआयआरमध्ये आणि या एफआयआरमध्ये काहीच फरक नाही. पण अजित पवार यांचा एफआयआर जर या महाराष्ट्रात घेत नसतील याला आपण काय म्हणणार. मग जे सत्तेत आहेत. त्यांच्यात काही ताकद असेल तर निदान एफआयआर होण्यासाठी ताकद लावा. दिल्लीत जाऊन बड्या नेत्यांना भेटल्यास फायदा होईल, असे आमदार रोहित पवार म्हणाले.
सरकारी पाहुणचार की चौकशी?
काल व्हीएसआर कंपनीचा मालक व्ही. के. सिंग हा काल सीआयडी ऑफिसमध्ये आला होता. पोलिसांना भेटण्यासाठी आलेल्या माणसाच्या आसपास बघितलं तर बंदुकधारी सुरक्षा होती. सकाळी ११ ते ११.३० या दरम्यान व्ही. के. सिंग हा सीआयडी कार्यालयात आल्याचे आम्हाला समजले. त्याला पार नाष्ट्यापासून जेवणापर्यंत देण्यात आल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला. तर आम्हाला असं ही कळलं की कदाचित संध्याकाळी अर्धा एक तास त्याला क्रिकेटची मॅच सुद्धा दाखवली. त्याचबरोबर त्याचे कार्यालयात येतानाचे फुटेज आपल्याला दाखवले. पण जाताना तो कुठल्या गाडीत गेला हे लोकांना कळलं नाही. मीडिया आणि कार्यकर्त्यांशी बोलताना हे कळलं की काळाबाजार करणारा हा व्ही.के सिंग याला पोलिसांच्याच काळ्या रंगाची काच असलेल्या गाडीतून बाहेर काढण्यात आलं. गुन्हेगारी कृत्यातील प्रमुख व्यक्तीला जर इतकी व्हिआयपी वागणूक मिळत असेल तर हा दु:खदायक प्रकार म्हणावा लागेल, अशी प्रतिक्रिया पवार यांनी दिली.
CID कार्यालयात जाणार
आज संध्याकाळी मी सीआयडी कार्यालयात जाणार आहे. माझ्याकडे जी काही कागदपत्रं आहेत. ही नवीन कागदपत्रं मी त्यांना देणार आहे. त्याचबरोबर एएआयबीचा अहवाल आल्यानंतर आम्ही गुन्हा दाखल करू असे त्यांनी आम्हाला सांगितलं होतं. आज जाऊन आम्ही एफआयआर करणार आहेत की नाही याची विचारणा करणार आहे. दादांच्या जवळच्या आणि सत्ते असणाऱ्या लोकांना मला इतकंच सांगायचं आहे की, तुम्ही सत्तेत असताना सुद्धा चौकशी ज्या दिशेनं जायला हवे, ज्या ताकदीने ते पुढे जायला हवे. पारदर्शकता व्हायला हवे. गुन्हा दाखल होत नाही, यावरून सत्तेत असतानाही तुम्हाला अजितदादांना न्याय देता येत नाही असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला.