कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी आरपीएफ योद्धे सज्ज, आवश्यक वस्तूंची वाहतूक निश्चित करणार

मध्य रेल्वेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या कामाची माहिती प्रसिद्धीपत्रक काढत दिली आहे (Corona relief work by Central Railway).

कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी आरपीएफ योद्धे सज्ज, आवश्यक वस्तूंची वाहतूक निश्चित करणार
| Updated on: Apr 11, 2020 | 10:41 PM

मुंबई : मध्य रेल्वेचे रेल्वे संरक्षण बल देखील कोरोना व्हायरसशी झुंज देण्याच्या कामात आघाडीवर आहे. अत्यावश्यक आस्थापने, मालमत्ता आणि इतर रेल्वे मालमत्तांचे संरक्षण करण्याशिवाय रेल्वेचे अधिकारी, वैद्यकीय विभाग, राज्य पोलिस आणि नागरी प्रशासनाबरोबर खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. कोविड-19 चा मुकाबला करण्यासाठी सॅनिटायझर्सचे व मास्क यांच्या उत्पादनासह जागरुकता मोहीम, अन्न वितरण अशा अत्यंत आवश्यक कामातही मोठे योगदान देत आहेत.  याबाबत मध्य रेल्वेने प्रसिद्धीपत्रक काढत माहिती दिली आहे (Corona relief work by Central Railway).

रेल्वे विभागाने म्हटलं आहे, “रेल्वे संरक्षण दल लॉकडाऊन दरम्यान कोच, लोकोमोटिव्ह्ज, स्टॅबल्ड रॅक, यार्ड्स, सिग्नलिंग इन्फ्रास्ट्रक्चर, स्टेशन, रिले रुम, वस्तूंचे शेड, वॅगन स्टॉक इत्यादी संपत्तीचे संरक्षण केले जात आहे. सर्व चल व अचल मालमत्तेवर 24x 7 सतत लक्ष ठेवण्यात येत आहे. रेल्वेने कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्याचे धोरण म्हणून प्रवाशांच्या सेवेची वाहतूक थांबवली आहे. परंतु आवश्यक वस्तूंची वाहतूक करण्यासाठी मालगाड्या चालवण्यात येत आहेत. देशभरातील औषधांसह, वस्तूंची शृंखला सुनिश्चित करण्यासाठी अजूनही अखंडित पुरवठा केला जात आहे.”

आरपीएफ अधिकाऱ्यांसाठी या लॉकडाऊन दरम्यान रेल्वेच्या मालमत्ता, वस्तू, पार्सल, आवश्यक वस्तूंचे संरक्षण करणे आणि त्यांची सुरक्षा करणे हे एक आव्हान आहे. असं असलं तरी या कठीण काळात मध्य रेल्वेची महत्त्वपूर्ण भूमिका समजून घेत बरेच कर्मचारी शांतपणे या कठीण परिस्थितीत धैर्याने काम करत आहेत. प्रत्येक वस्तू /पार्सल गाड्या त्यांच्या निश्चितठिकाणाकडे जाण्यासाठी रेल्वे संरक्षण दलाच्या जवानांद्वारे संरक्षित केलेल्या आहेत, असं रेल्वे विभागाने सांगितलं.

रेल्वे सुरक्षा दलाच्या या योद्ध्यांपैकी एन. एस. राठोड, हेड कॉन्स्टेबल आणि कमांडंट आर. के. सैनी अशी काही जवानांची नावं आहेत. या कठीण काळात आवश्यक वस्तू आणि औषधांची सहज वाहतूक सुनिश्चित करत आहेत. राठोड छत्रपती शिवाजी महाराज स्थानक येथून लोणावळ्याला विशेष पार्सल गाड्यांना संरक्षित करत घेऊन गेले आणि परत येताना दुसऱ्या पार्सल विशेष गाडीला पहारा देत आले. तसेच सैनी यांनी विशेष पार्सल गाड्यांची सुरक्षा नाशिकपर्यंत व परत येताना केली. लॉकडाउनच्या वेळी, या योद्ध्यांनी ते पुन्हा आपल्या निवासी बॅरेक्सवर परत कधी येतील हे ठाऊक नसताना सामान्य कामाच्या तासांशिवाय अनेक तास व्यतीत केले. त्यांची कुटुंबे मूळ गावी ठेवून कोट्यावधी नागरिकांपर्यंत आवश्यक गोष्टी पोचविण्यास संरक्षणासाठी कटिबद्ध असल्याने त्यांना कोविड -19 विरुद्ध लढणारे योद्धा असं म्हटलं जात आहे.

संबंधित बातम्या :

Maharashtra extends lockdown : वाढवलेल्या लॉकडाऊनमधून कुणाकुणाला सूट?

‘नहीं पहनोगे मास्क तो, मुर्गा बनकर करोगे नागिन डान्स’, मुंबई पोलिसांचं ‘मुर्गा अभियान’

लॉकडाऊनबाबत महत्त्वाची बैठक, मोदी-मुख्यमंत्र्यांच्या बैठकीतील 10 मुद्दे

लॉकडाऊनबाबत महत्त्वाची बैठक, मोदी-मुख्यमंत्र्यांच्या बैठकीतील 10 मुद्दे

Corona : चेंबूरमध्ये 9, तर दादरमध्ये 5 नवे कोरोनाबाधित, 56 जणांना क्वारंटाईन

पुणे, ठाणे, नागपुरात कोरोनाचे रुग्ण वाढतेच, राज्यात कुठे किती नवे रुग्ण?

Corona relief work by Central Railway