लॉकडाऊनबाबत महत्त्वाची बैठक, मोदी-मुख्यमंत्र्यांच्या बैठकीतील 10 मुद्दे

पंतप्रधान नरेंद्र मोदींची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे महत्त्वपूर्ण बैठक  पार (PM Narendra Modi Video Conference With All CM) पडली.

लॉकडाऊनबाबत महत्त्वाची बैठक, मोदी-मुख्यमंत्र्यांच्या बैठकीतील 10 मुद्दे
pm modi uddhav thackeray
Follow us
| Updated on: Apr 11, 2020 | 3:07 PM

नवी दिल्ली : देशात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. देशात 7 हजारपेक्षा (PM Narendra Modi Video Conference With All CM) जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे महत्त्वपूर्ण बैठक  पार पडली. या बैठकीत कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशातील लॉकडाऊन वाढवायचा, काढायचा की प्रत्येक राज्यावर त्याचा निर्णय सोपवायचा याबाबतचा महत्त्वपूर्ण  निर्णय घेण्यात आल्याची शक्यता आहे. मोदी आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली.

नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशातील विविध (PM Narendra Modi Video Conference With All CM) राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन वाढण्याची तयारी दर्शवली आहे. यासाठी त्यांनी केंद्र सरकारकडे मदतीची मागणी केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात 30 एप्रिलपर्यंत लाॅकडाऊन वाढण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

संपूर्ण देशात लॉकडाऊन वाढवला पाहिजे. कोणत्याही एखाद्या राज्यात लॉकडाऊन हटवणं योग्य नाही, असे मत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी यावेळी व्यक्त केलं.

या बैठकीत मोदी स्वत: मास्क घालून बसले होते. विशेष म्हणजे त्यांनी घरगुती रुमालाने हा मास्क तयार केला आहे.

त्यामुळे ज्यांच्याकडे मास्क नाही ते घरातील स्वच्छ कापडाचा मास्क म्हणून वापर करु शकतात. तसेच घरातून बाहेर पडताना प्रत्येकाने मास्क वापरा, असा सल्लाही मोदींनी याद्वारे दिला आहे. मोदी आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली.

मोदी-मुख्यमंत्री बैठकीत काय झाले? 

1 बहुतांश राज्यांची लॉकडाऊन वाढवण्याची मागणी केली. 2 मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून लॉकडाऊन वाढवण्याची मागणी करण्यात आली. 3 राज्यांच्या नव्हे देशाच्या पातळीवरच लॉकडाऊन राहावे असा सूर सर्व मुख्यमंत्र्यांचा होता. 4 मुख्यमंत्र्यांनी मला कधीही सल्ले द्यावे, 24 तास उपलब्ध, असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. 5 केंद्र सरकारने वैद्यकीय उपकरणे, मदत राज्यांना द्यावी अशीही मागणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आली. 6 केंद्राने आर्थिक मदतही द्यावी अशी राज्यांनी मागणी केली. 7 लॉकडाऊन वाढवा,मेडिकल किट्स द्या असे पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह म्हणाले. 8 व्यावहारिक निर्णय घ्या, असा सल्ला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिला. 9 आपण एकजुटीने, खांद्याला खांदा देऊन लढू, असे मोदी यावेळी म्हणाले. 10 थोडीशी शिथीलता आणून लॉकडाऊन वाढू शकतं अशी शक्यता वर्तवली जात आहे.

संबंधित बातम्या : 

महाराष्ट्रात लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढवण्याची तयारी, पंतप्रधानांची सर्व मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

रुमालाचा मास्क लावून मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगला, उद्धव ठाकरे, केजरीवालही मास्कमध्ये

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.