वाझे-देशमुख ‘सेटलमेंट’च्या पत्रात थेट शरद पवारांचा उल्लेख, वाचा सविस्तर प्रकरण

राज्यात मागील काही दिवसांमधील दुसरा लेटर बॉम्ब पडलाय. एनआयएच्या अटकेत असलेला निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेने हा लेटर बॉम्ब टाकलाय.

वाझे-देशमुख 'सेटलमेंट'च्या पत्रात थेट शरद पवारांचा उल्लेख, वाचा सविस्तर प्रकरण
Follow us
| Updated on: Apr 07, 2021 | 7:41 PM

मुंबई : राज्यात मागील काही दिवसांमधील दुसरा लेटर बॉम्ब पडलाय. एनआयएच्या अटकेत असलेला निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेने हा लेटर बॉम्ब टाकलाय. यात महाविकास आघाडी सरकारच्या 3 बड्या नेत्यांचा थेट उल्लेख झालाय. विशेष म्हणजे या लेटर बॉम्बमध्ये देखील शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आलाय. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात भूंकप झालाय. वाझेंच्या आरोपांनंतर शिवसेनेचे मंत्री आणि परिवहन मंत्री अनिल परब यांना स्वतः माध्यमांसमोर येऊन स्पष्टीकरण द्यावं लागलंय. त्यामुळे आता या प्रकरणात शरद पवार काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे (Sachin Vaze take Sharad Pawar name in his explosive letter about Anil Deshmukh and Anil Parab).

सचिन वाझेने आपल्या पत्रात शरद पवार यांचा आपल्या नियुक्तीला विरोध होता, असं नमूद केलंय. तसेच आपल्या नियुक्तीसाठी शरद पवार यांचं मन वळवण्यासाठी माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी 2 कोटी रुपयांची मागणी केल्याचा खळबळजनक आरोप केलाय. सचिन वाझेंनी या पत्रात थेट शरद पवारांचा उल्लेख केल्यानं आता पवारांची भूमिका काय आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सचिन वाझेंच्या पत्रात नेमकं काय?

सचिन वाझे यांनी लिहिलेल्या पत्रात अनेक गौप्यस्फोट करण्यात आले आहेत. 2020 मध्ये त्यांना पुन्हा सेवेत घेतल्यानंतर तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मला सांगितलं होतं की, मला पुन्हा सेवेत घेण्यास शरद पवार यांचा विरोध आहे. तेव्हा गृहमंत्र्यांनी सांगितलं की ते पवारांचं मन वळवतील आणि त्यासाठी त्यांनी माझ्याकडे 2 कोटी रुपयांची मागणी केली. पण एवढी मोठी रक्कम देण्यास मी असमर्थता दर्शवली. त्यावर गृहमंत्र्यांनी मला पुढे ही रक्कम देण्यास सांगितलं.

ऑक्टोबर 2020 मध्ये तत्कालीन गृहमंत्र्यांनी मला सह्याद्री गेस्ट हाऊसवर बोलावलं होतं आणि मुंबई शहरातील 1 हजार 650 बार, रेस्टॉरंट्समधून पैसा गोळा करण्यास सांगितलं होतं. मात्र, हे आपल्या क्षमतेच्या बाहेर असल्याचं सांगत आपण त्यास नकार दिला होता.

इतकंच नाही तर सचिन वाझे यांनी आपल्या पत्रात अनिल देशमुख यांच्यासह शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरही खंडणी मागितल्याचा गंभीर आरोप केलाय.

पत्राची सत्यता पडताळून कारवाईचे आदेश

दरम्यान, या पत्राची सत्यता तपासून कारवाई करण्याचे आदेश कोर्टाने CBIला दिले आहेत. या प्रकरणात आता NIA बरोबरच आता CBI कडून प्रत्यक्षरित्या तपासाला सुरुवात होणार आहे. इतकच नाही तर संबंधित पत्रावरुन मॅजिस्ट्रेटसमोर सचिन वाझे यांचा जबाबही नोंदवण्यात आला आहे. लिहिलेल्या पत्रावरुन वाझे यांनी घुमजाव करु नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे.

व्हिडीओ पाहा :

हेही वाचा :

EXCLUSIVE : अनिल देशमुखांनी 2 कोटी मागितले, सचिन वाझेंचा लेटरबॉम्ब, मविआच्या 3 मंत्र्यांवर गंभीर आरोप

सिल्व्हर ओकवर राष्ट्रवादीच्या नेत्यांची खलबतं; मविआ सरकार सीबीआय चौकशीच्या निर्णयाविरोधात दंड थोपटणार?

Anil Deshmukh resign: अनिल देशमुख यांचं राजीनामा पत्र जसंच्या तसं

Sachin Vaze take Sharad Pawar name in his explosive letter about Anil Deshmukh and Anil Parab

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.